News

नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या हफ्त्यात आणि या महिन्याच्या सुरवातीला पडलेल्या अवकाळी पावसामुळे (Untimely Rain) सर्वात जास्त नुकसान शेतकऱ्यांचे (Farmers Loss) झाले आहे. पावसाच्या अवेळी आगमनाने राज्यातील फळबागा (Orchards) क्षतीग्रस्त झाल्या होत्या, द्राक्ष बागांना (Grape Orchards) यामुळे सर्वात जास्त फटका बसला होता. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री (Minister of Agriculture) दादाजी दगडू भुसे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता ताबडतोब नुकसान भरपाईची पाहणी (Compensation inspection) आणि पंचनामे करण्याचे निर्देश दिले होते.

Updated on 31 December, 2021 12:24 PM IST

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, राज्यात सर्व्यात जास्त द्राक्ष लागवड पश्चिम महाराष्ट्रात बघायला मिळते, आणि अवकाळीचा कहर पश्चिम महाराष्ट्रातच अधिक होता. भुसे (Dadaji Bhuse) यांच्या निर्देशानुसारच पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील द्राक्ष बागायतदार यांना आर्थिक मदत मिळाली, मात्र मिळालेली नुकसान भरपाई नुकसानीच्या एकपट देखील नाही असे द्राक्ष बागायतदारांचे म्हणणे आहे. द्राक्ष बागायतदारांच्या मते, द्राक्ष बागांना हजारो रुपयांच्या महागड्या फवारण्या कराव्या लागतात, तसेच द्राक्ष बागांची जोपासणी करण्यासाठी एका हंगामात लाखोंचा खर्च येतो आणि शासनाने हेक्टरी 18 हजार रुपये आर्थिक साहाय्य दिले आहे, म्हणुन या तुटपुंजी मदतीने नुकसानीची भरपाई निघणे अशक्य आहे.

अवकाळीमुळे लाखोंचे नुकसान झाले आहे तसेच यामुळे रब्बी हंगामाच्या (Rabbi Season) पिकांना मोठा फटका बसला आहे तसेच काही भागात दुबार पेरणी (Double Sowing) देखील करावी लागली आहे. एकंदरीत निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांचे पार कंबरड मोडलं आहे, द्राक्ष उत्पादक शेतकरी तर यामुळे कंगाल झाल्यासारखे आहेत आणि शासनाने द्राक्ष बागांना हेक्टरी 18 हजाराची मदत दिली आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर (Indapur) तालुक्यासाठी नुकसान भरपाई म्हणुन 74 लाख 73 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळाले आहे.

तालुक्यातील 815 हेक्टरवरील द्राक्ष बागा उध्वस्त झाल्या आहेत, तर यामुळे 61 गावातील 825 द्राक्ष बागायतदारांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी (Grape growers) मिळालेल्या मदतीला तुटपुंजी सांगत आहेत, असे असले तरी अडचणीत सापडलेल्या द्राक्ष बागायतदारांना याचा थोडा का होईना दिलासा मिळताना दिसत आहे. मात्र हा थोडासा दिलासा देखील अद्यापपर्यंत काही भागाततील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मिळालेला नाही, याचे प्रमुख कारण म्हणजे अजूनही काही भागातील नुकसानीचा अहवाल कृषी विभागाकडे (To the Department of Agriculture) पोहचलेला नाही. ज्या जिल्ह्याचा अहवाल कृषी विभागाला प्राप्त होत आहे त्या जिल्ह्याला शासनाकडून मदत दिली जात आहे. ज्या जिल्ह्यात अजूनही द्राक्ष बागायतदारांना मदत मिळालेली नाही त्यांना लवकरच मदत मिळण्याची आशा आहे.

English Summary: Compensation received by grape growers but farmers are still unhappy
Published on: 31 December 2021, 12:24 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)