News

पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. असे असताना औरंगाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी चक्क स्मशानभूमीत दिवाळी साजरी करत आंदोलन केला आहे. औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील वाहेगाव येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे.

Updated on 25 October, 2022 10:21 AM IST

पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. असे असताना औरंगाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी चक्क स्मशानभूमीत दिवाळी साजरी करत आंदोलन केला आहे. औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील वाहेगाव येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे.

असे असताना मात्र सरकारकडून अद्याप कोणतीही मदत मिळाली नाही. त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी आज गावातील स्मशानभूमीत दिवाळी साजरी करत अनोखं आंदोलन केलं. यामुळे याची चर्चा सुरु आहे. अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत कोणतीही शासकीय यंत्रणा पोहोचली नाही.त्यामुळे सरकारकडून शेतकऱ्यांसाठी कोणतीही भरीव मदत मिळत नसल्याचे चित्र आहे.

अशात दिवाळी सारखा सण आला आहे, मात्र आमच्याकडे यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे गावातील सर्व शेतकरी आज स्मशानभूमीत दिवाळी साजरी करत असल्याचं निवेदनात म्हंटल आहे. यामुळे याचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामुळे शेतकऱ्याची दिवाळ गोड झाली नाही. त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

देशी बटाटे विदेशींना पसंत, निर्यात 4.6 पटीने वाढली! आता बटाट्यापासून शेतकऱ्यांना चांगले दिवस..

यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली. दरम्यान, पहिल्यांदा औरंगाबाद जिल्ह्याला कृषिमंत्री पद मिळाले आहे. मात्र असे असतांना अजूनही ओला दुष्काळ सारखी परिस्थिती नसल्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार सांगत आहेत. यामुळे त्यांनी प्रत्यक्षात शेताची पाहणी करावी, असे शेतकरी सांगत आहेत.

शेतकऱ्यांनो तुम्ही असे का नाही करत? हा पठ्ठया विकतोय 100 रुपये किलोने ऊस, आता शेतकऱ्यांनाच व्यापारी व्हावे लागेल..

कापसाच्या झाडाला फक्त दोन कैऱ्या लागल्या आहे. त्यामुळे अशात कशी दिवाळी साजरी करणार असा आम्हाला प्रश्न पडला आहे. यामुळे शेतकरी मदतीची मागणी करत आहेत. दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. काही भागात अजूनही शेतात पाणी आहे. पीक पिवळी पडली आहे.

महत्वाच्या बातम्या;
सितरंग चक्रीवादळ आज धडकणार, 7 राज्यांना फटका बसणार
'साखर कारखाना हे मंदिर आणि शेतकरी हे देव'
'गोलू' चा पॅटर्नच वेगळाय! खाद्य आणि किंमत वाचून येईल चक्कर..

English Summary: compensation not received, farmers celebrated 'Diwali' graveyard
Published on: 25 October 2022, 10:21 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)