1. बातम्या

राज्यातील बर्ड फ्लू नुकसानग्रस्तांना मिळणार अशा पद्धतीने नुकसान भरपाई

राज्यातील बर्ड फ्लू मुळे होणारे नुकसानग्रस्त पोल्ट्री व्यावसायिकांना मदतीचा निर्णय घेण्यात आला असून विविध टप्प्यातील पक्ष्यांना वेगवेगळी मदत मिळणार असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिली.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
bird flu

bird flu

राज्यातील बर्ड फ्लू मुळे होणारे नुकसानग्रस्त पोल्ट्री व्यावसायिकांना मदतीचा निर्णय घेण्यात आला असून विविध टप्प्यातील पक्ष्यांना वेगवेगळी मदत मिळणार असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिली.

ते म्हणाले की, बर्ड फ्लू रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जे क्षेत्र बाधित आहे त्या क्षेत्राच्या एक किमी परिघातील जाणीवपूर्वक नष्ट करण्यात आलेले कोंबड्या व इतर पक्षी, अंडी आणि पक्षी खाद्याचे नुकसान भरपाई अदा करणे व रोग नियंत्रणाच्या ऑपरेशनल कॉस्ट अंतर्गत एकशे तीस लाख रुपये मंजूर केले आहेत. यामध्ये पक्षांच्या वयानुसार टप्पे करण्यात आले आहेत.

हेही वाचा:बर्ड फ्लूमुळे अस्वस्थ पोल्ट्री व्यावसायिक, दररोज कोट्यावधी अंडी आणि कोंबडीची उलाढाल

आठ आठवडे वयापर्यंत अंडी देणारे पक्षी रुपये वीस प्रतिपक्षी, आठ आठवड्यात वरील अंडी देणारे पक्षी रुपये 90 प्रतिपक्षी, सहा आठवडे व्या पर्यंतचे मांसल कुक्कुट पक्षी रुपये 70 प्रतिपक्षी, कुक्कुट पक्ष्यांची अंडी रुपये तीन रुपये प्रति अंडी, कुक्कुट पक्षी खाद्य प्रति किलोग्राम 12 रुपये, सहा आठवडे वयापर्यंत चे बदक प्रति पक्षी 35 रुपये आणि सहा आठवड्यावर बदक प्रति पक्षी 135 रुपये अशाप्रकारे बाधित क्षेत्राच्या एक किमी परिघातील कुक्कुट पालकांना जाणीव पूर्वक नष्ट करण्यात आलेले त्यांचे कुकुट व इतर पक्षी, अंडी आणि पक्षी खाद्य ची नुकसान भरपाई अदा  केले जाणार असल्याचे श्री केदार यांनी सांगितले.

कुक्कुट पक्ष्यांचे मास वांडे हा प्रथिनांचा स्वस्तात उपलब्ध होणारा स्त्रोत आहे. बर्ड फ्लू बाधित क्षेत्र वगळून पूर्णपणे व्यवस्थित शिजवलेले कोंबड्यांचे मांस आणि उकडलेली अंडी खाणे सुरक्षित आहे. कुक्कुट पक्षी विक्रेत्यांनी हातात ग्लोव्हस, नाका तोंडाला पूर्णपणे झाकणारा मास्क, दुकानात निर्मितो काटेकोर स्वच्छता व सामाजिक अंतर या निर्देशांचे काटेकोर पालन करावे.

English Summary: Compensation in such a way that the bird flu victims in the state will get it Published on: 27 January 2021, 12:25 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters