News

यावर्षी खरीप हंगामामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि नद्यांना आलेल्या महापुरामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पुरामुळे बऱ्याच ठिकाणी जमिनी खरडले गेल्या.त्यामुळे शेतकरी फार मोठ्या संकटात सापडले होते

Updated on 15 December, 2021 9:38 AM IST

यावर्षी खरीप हंगामामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि नद्यांना आलेल्या महापुरामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पुरामुळे बऱ्याच ठिकाणी जमिनी खरडले गेल्या.त्यामुळे शेतकरी फार मोठ्या संकटात सापडले होते

या पार्श्वभूमीवर सरकारने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाईचे आश्वासन दिले होते. हे नुकसान भरपाई चे पैसे दिवाळीत येणार असे म्हटले जात होते परंतु दिवाळीत न येता हे नुकसानभरपाईचे पैसे तीन महिन्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत विमा कंपनीच्या हलगर्जीपणामुळे एवढा उशीर झाला.

 विमा कंपन्यांकडून वेळोवेळी टाळाटाळ

 खरीप हंगामातील पिकांची नुकसान भरपाई लवकर मिळावी म्हणून शेतकरी आंदोलन देखील केली.विमा  कंपनी यांच्याकडे दुर्लक्ष करत होती. अशा वर्तनामुळे विमा कंपन्यांच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण होते असे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी कंपनीच्या बैठकी घेऊन विमा रक्कम वेळ जमा करण्याच्या सूचना केल्या होत्या.

सर्व गोष्टी मनावर घेऊन गेल्या दोन दिवसापासून विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या  19 लाख 66 हजार शेतकऱ्यांचे दावे निकाली काढण्यात आले आहेत. या आपत्तीमुळे शेतकऱ्यांना विमा 1351 कोटी रुपये दिले आहेत. विभागाने जीवनाची योजना राबवली होती ते शेतकऱ्यांसाठी आता कामी आली.

शेतकऱ्यांनी विमा भरला आहे म्हणल्यावर त्यांना मदत मिळाली पाहिजे अशी भूमिका कृषी विभागाने घेतली होती.

 भरपाईच्या  रकमेमध्ये काही समस्या असल्यास……………

 शेतकऱ्यांना भरपाई तारक मे बद्दल काही अडचण असल्यास जसे की रक्कम कमी आल्यास, रक्कम जमा न झाल्यास अशा समस्या जर आल्या तर त्यासाठी शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय, कृषी अधिकारी किंवा जमा कंपनीचे प्रतिनिधी यांच्याशी संपर्क करावा.

(संदर्भ-मी ई शेतकरी)

English Summary: compansation package fund ccollect in farmer account to rain calamities
Published on: 15 December 2021, 09:38 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)