News

गेल्या काही दिवसांपासून राज्यात विजेचे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. शेतीची वीज तोडली जात असल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. असे असताना आता सर्वसामान्य लोकांना झटका देणारी बातमी समोर आली आहे.

Updated on 24 November, 2022 11:54 AM IST

गेल्या काही दिवसांपासून राज्यात विजेचे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. शेतीची वीज तोडली जात असल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. असे असताना आता सर्वसामान्य लोकांना झटका देणारी बातमी समोर आली आहे.

आता राज्यात विजेच्या दरात किमान ६० पैसे प्रतियुनिट वाढ होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्याचे वीज बिल किमान २०० रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे घरातील बजेट पुन्हा एकदा वाढणार आहे. वीजनिर्मितीचा खर्च वाढल्याने हा निर्णय घेण्यात येणार आहे.

आयात करावा लागणारा कोळसा, त्यातून वाढलेला वीजनिर्मिती खर्च, बाहेरून खरेदी करावी लागलेली वीज, क्रॉस सबसिडीच्या रूपात मिळालेले कमी अनुदान अशा कारणांमुळे महावितरणचा वीज खरेदी खर्च खूप वाढला आहे. यामुळे दरवाढ करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नसल्याचे सांगितले जात आहे.

शेतकऱ्यांची परिस्थिती बघून कृषिमंत्र्यांचा थेट अधिकाऱ्यांना फोन, महावितरणने थांबवली वसुली

यामुळे विजेच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. वीज खरेदी खर्चातील वाढीपोटी महावितरणने १५०० कोटी रुपये राखीव ठेवले होते. मात्र हा निधी गेल्यावर्षीच संपला. यामुळे महावितरणने खरेदीच्या वाढीपोटी इंधन समायोजन शुल्क आकारण्यास सुरुवात केली.

शेतकऱ्यांची परिस्थिती बघून कृषिमंत्र्यांचा थेट अधिकाऱ्यांना फोन, महावितरणने थांबवली वसुली

दरम्यान, याआधीच राज्य सरकारने राज्यात विजेच्या दरात १० ते २० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. आता पुन्हा एकदा वाढ होत असल्याने मात्र याची झळ बसणार आहे.

महत्वाच्या बातम्या;
गळीत हंगाम सुरू करण्यापूर्वी ऊसदर जाहीर केला नाही, कारखान्यावर कारवाई करा
यामध्ये 15 कोटींपेक्षा जास्त मिरचीचे नुकसान झाले असल्याचे सांगितले जात आहे
माळेगाव कारखान्याचा निर्णय उच्च न्यायालयानेही फेटाळला, पवार समर्थकांना मोठा धक्का..

English Summary: common people! increase in the price of electricity.
Published on: 24 November 2022, 11:54 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)