Parliament Session News : संसदेच्या पाच दिवसीय विशेष अधिवेशनाला आजपासून (दि.१८) सुरुवात होत आहे. त्यामुळे अधिवेशनात नेमके काय निर्णय घेतले जातात. याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. तसंच देशातील मणिपूर, महागाई, आगामी निवडणुका अशा विविध मुद्द्यांवरुन विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे.
आजपासून सुरु असलेले अधिवेशन २२ सप्टेंबरपर्यंत सुरु असणार आहे. यादरम्यान सभागृहाचं कामकाज सकाळी ११ ते दुपारी १ मग दुपारी २ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरु राहिल. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे आज राज्यसभेत ७५ वर्षांचा संसदीय प्रवास, कामगिरी, अनुभव, आठवणी यावर चर्चा होणार आहे.
अधिवेशनापूर्वी पंतप्रधान काय म्हणाले?
चंद्रावर चांद्रयान-३ चं सॉफ्ट लँडिंग यशस्वी झालंय. त्यामुळे जगभरात भारताचे नाव झाले आहे. स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दलही चर्चा होऊ शकते. २०४७ पर्यंत देशाला जगात विकसितशील बनवायच आहे. नवा संकल्प, नवी उर्जा, नवी प्रेरणा असा नारा देखील मोदींना अधिवेशनापूर्वी दिला आहे. सर्व जुन्या वाईट गोष्टी सोडून आपण संसदेत प्रवेश करु, असं देखील पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.
दरम्यान,अधिवेशनाची सुरुवात जुन्या संसदेतूनच होणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे (१९ सप्टेंबर) जुन्या संसद भवनातच फोटो सेशनचं आयोजन करण्यात आले आहे. त्याच दिवशी सकाळी ११ वाजता सेंट्रल हॉलमध्ये कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर खासदार नवीन संसद भवनात प्रवेश करणार आहेत.
Published on: 18 September 2023, 10:53 IST