1. बातम्या

उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना मिळतय रंगीत मासे संवर्धनाचे प्रशिक्षण

KJ Maharashtra
KJ Maharashtra
Colorful Fish Culture Training for Farmers in Uttar Pradesh

Colorful Fish Culture Training for Farmers in Uttar Pradesh

चंद्रशेखर आझाद कृषी आणि प्रोउद्योगिक विश्वविद्यालय कानपुर येथील विटावा परिसरामध्ये असलेले मच्छ महाविद्यालय आणि रिसर्च सेंटरद्वारा रंगीत माशांवर संशोधन केले जात आहे. दरम्यान रंगीत माशांचे संवर्धन करण्याचे प्रशिक्षण आता शेतकऱ्यांना सुद्धा दिले जात आहे. त्यामुळे शेतकरी स्वावलंबी बनतील आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल.

काही दिवसांपासून उत्तर प्रदेशचे कृषिमंत्री सूर्य प्रताप शाही यांच्या दौऱ्याच्या दरम्यान हा निर्णय घेतला गेला.महाविद्यालय परिसरामध्ये असलेल्या तलावांमध्ये ऑर्नामेंटल फिश  कल्चरचे  काम केले जात आहे. कोरोना काळापासूनच विश्वविद्यालयाचे कुलगुरू डीआर सिंह यांच्या निर्देशानुसार महाविद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थ्यां द्वारे अधिष्ठाता डॉक्टर जे पी यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ऑर्नामेंटल फिश कल्चरचे काम चालवले जात आहे.

महाविद्यालय परिसरामध्ये असलेल्या तलावांमध्ये या प्रकारचे मासे दीडशे ते दोनशे ग्रॅमपर्यंत असलेली लाल, निळी, पिवळी, सफेद आणि हिरवा रंगाच्या पोली लाईन तलावांमध्ये दिसून आल्या. यात प्रमुख दोन जातींचे संवर्धन केले जात आहे. यामध्ये एक चायनीज कोई कॉरप आणि दुसरी जापनीज कोई कॉरप या जातींचे संवर्धन केले जाते. या जातींचे प्रजनन जुलाई आणि ऑगस्टमध्ये केले गेले होते. त्यामुळे त्यांची पिल्ले आता दिसत आहेत.

कृषिमंत्री यांच्या निर्देशानुसार महाविद्यालय प्रशासनाद्वारे या माशांचे प्रजनन मोठ्या प्रमाणात करण्याचा निर्णय घेतला आहे.ऑर्नामेंटल फिश कल्चरला शेतकऱ्यांसोबत कसे जोडले जाऊ शकते यासाठी स्टार्टरच्या माध्यमातून प्रोजेक्ट तयार करून आणि पुरुष आणि महिला शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम केले जात आहे. या प्रकल्पाला रोजगार पूरक बनवून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याचे उद्देश आहे. सहाय्यक निर्देशक मत्स्य टी कुमार यांच्या मदतीने शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाने फिश कल्चरचे प्रशिक्षण दिले जावे कारण ते स्वावलंबी बनू शकतील.

मत्स्य  महाविद्यालय आणि रिसर्च सेंटर मध्ये मागच्या हप्त्यात केलेल्या दौऱ्यामध्ये कृषिमंत्री सूर्य प्रताप शाही, कुलपती सी. एस. ए. डॉक्टर डी आर सिंह, आमदार सरिता भदौरिया, आमदार सावित्री कठेरिया, डीन  डॉ. जेपी सिंह सोबतच डॉ.ध्रुव कुमार इत्यादी उपस्थित होते.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters