News

पीक पध्दतीमध्ये बदल होत आहे. यामधून उत्पदानात वाढ व्हावी, हाच शेतकऱ्यांचा उद्देश राहिलेला आहे. बिहारमध्ये बदलाचा परिणाम म्हणून रंगीबेरंगी फुलकोबीचे उत्पादन घेतले जात असून याच्या लागवडीच्या क्षेत्रात वाढ होत आहे. यामध्ये पिवळ्या, केशरी आणि पांढऱ्या रंगाचे फुलकोबीचे प्रमाण अधिक आहे. विशेष म्हणजे या रंगीबेरंगी फुलकोबीचे सेवन केल्यास अधिकचे फायदेही आहेत.

Updated on 28 January, 2022 4:18 PM IST

पीक पध्दतीमध्ये बदल होत आहे. यामधून उत्पदानात वाढ व्हावी, हाच शेतकऱ्यांचा उद्देश राहिलेला आहे. बिहारमध्ये बदलाचा परिणाम म्हणून रंगीबेरंगी फुलकोबीचे उत्पादन घेतले जात असून याच्या लागवडीच्या क्षेत्रात वाढ होत आहे. यामध्ये पिवळ्या, केशरी आणि पांढऱ्या रंगाचे फुलकोबीचे प्रमाण अधिक आहे. विशेष म्हणजे या रंगीबेरंगी फुलकोबीचे सेवन केल्यास अधिकचे फायदेही आहेत.

इतर सामान्य फुलकोबीच्या दरापेक्षा याची किंमत अधिक असल्याने शेतकऱ्यांना अधिकचे उत्पन्नही मिळत आहे. काही शेतकऱ्यांनी याचे प्रयोग केले असून ते यशस्वी झाल्यानंतर आता याचे क्षेत्र वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. याकरिता केंद्रीय कृषी विश्व विद्यालयाचे प्राध्यापक-सह-संचालक डॉ. राजेंद्र प्रसाद, प्राध्यापक डॉ. एस. के. सिंग हे शेतकऱ्याला त्याचे महत्त्व आणि त्याची लागवड कशी करावी हे समजावून सांगितले आहे. बिहारमध्ये काही प्रगतशील शेतकरी हे पिवळ्या आणि इतर रंगाच्या फुलकोबीची शेती करीत आहेत. प्रयोगशील शेतकरी गेल्या अनेक वर्षापासून अशी शेती करीत आहेत. यामुळे नवनवीन बाबी समोर तर येतातच पण उत्पादनातही वाढ होते.

हेही वाचा : डीएपी खतांचा वापर कमी करा, एनपीके, द्रवरुप युरियाचा वापर वाढवा- केंद्रीय कृषिमंत्री

जाणून घ्या रंगीबेरंगी फुलकोबीबाबत

पिवळा कोबी हा कॅरोटिना आहे, तर गुलाबी जांभळा कोबी अल्ंटिला आहे. डॉ.एस.के. सिंह यांच्या मते हा कोबी डोळ्यांसाठी फायदेशीर ठरत असून कॅन्सरपासून बचावासाठी त्याचं सेवन केल जात आहे. रंगीत कोबीचे बियाणे शेतकरी अमेझॉन, फ्लिपकार्ट किंवा स्नॅपडील सारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून खरेदी करू शकतात. सर्वात महत्वाची बाब म्हणजे सुरुवातीला जर तुम्ही लागवड करणार असताल तर त्याचे प्रमाण हे अत्यंत कमी असणे गरजेचे आहे. पहिला टप्पा पार केल्यानंतर हळूहळू त्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली तरी शेतकऱ्यांच्या फायद्याचे ठरणार आहे. ज्याप्रमाणे आपण नियमित कोबीची लागवड करतो अगदी त्याचप्रमाणे रंगीबेरंगी कोबीची लागवड करावी लागते.

 

रोगप्रतिकार शक्तीही वाढते

रंगीत कोबीमध्ये व्हिटॅमिन ‘ए’ मुबलक प्रमाणात आढळते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. यात व्हिटॅमिन ‘सी’ देखील भरपूर प्रमाणात असते. बागानी कोबीमध्ये अँटी-ऑक्सिडेंट्स आणि कॅल्शियम क्लोराईड आणि पाचक प्रणाली नियंत्रित करण्यासाठी जीवनसत्त्वे समृद्ध आहेत. यामध्ये सर्व प्रकारची जीवनसत्वे असतात.

English Summary: Colorful Cauliflower Increases Farmers' Yield
Published on: 28 January 2022, 04:16 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)