News

शेतीतून अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी शेतकरी शेतात नवनवीन बदल करत असतो. उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्याने नवीनच शक्कल लढवली आहे. सर्वत्र याच गोष्टीची चर्चा सुरु आहे. ती म्हणजे बिहार मधील केशरी कोबीचे.

Updated on 26 January, 2022 6:00 PM IST

शेतीतून अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी शेतकरी शेतात नवनवीन बदल करत असतो. उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्याने नवीनच शक्कल लढवली आहे. सर्वत्र याच गोष्टीची चर्चा सुरु आहे. ती म्हणजे बिहार मधील केशरी कोबीचे. बिहार मधील चपराण जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने ब्रासिका ओलेरेसिया या कंपनीच्या वाणाची लागवड केली आहे. देशातील अनेक शेतकरी हे आधुनिक पध्दतीने विदेशी पालेभाज्यांची लागवड करुन कितीतरी अधिक पटीने नफा कमावत आहे.

केशरी रंगाची कोबी ही सर्वोत्तम ठरलेली आहे. ही कॅनेडियन वंशाची भाजी आहे. ज्यामध्ये पोषणतत्वे चांगली असल्याने याला अधिकचा दरही मिळत आहे. परदेशातील भाज्यांची लागवड करुन आपले वेगळेपण सिध्द करीत आहेत. येथील अधिकत्तर शेतकरी सध्या कॅनडातील कोबीची चव चाखत आहेत.

बिहारमधील समूता गावात राहणारे आनंद हे पहिल्यापासूनच आधुनिक शेतीचा प्रयोग करीत आहेत. यावेळी संत्रा कोबी, बागणी कोबी आणि स्ट्रॉबेरीची लागवड करून ते पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहेत. आनंद सिंग हे कॅनडाच्या केशरी रंगाच्या कोबीच्या जातीची लागवड करीत आहेत. जगातील विविध देशांमध्ये वेगवेगळ्या नावांनी तो ओळखला जातो. शिवाय उत्पादनावर केलेल्या खर्चाच्या तुलनेत 7 ते 8 पटीने उत्पन्न मिळते.

कोबीला अधिकचा भाव मिळत आहे

स्थानिक बाजारात केशरी आणि जांभळ्या कोबीचा भाव 50 ते 60 रुपये किलो असून स्टेफ्री 260 रुपये किलो आहे असे शेतकऱ्याने सांगितले आहे. एक एकरात लागवड केल्यास 10 ते 12000 रुपये खर्च येतो तर उत्पन्न 70 ते 80 हजार रुपये मिळत असल्याचे शेतकऱ्याचे सांगितले आहे.

भरपूर जीवनसत्व

केंद्रीय विद्यापीठातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र प्रसाद, डॉ. एस. के. सिंह सांगतात की, केशरी कोबी ही मूळ जात ही कॅनडाची आहे. या जातीची अनेक वैशिष्ट्ये आहेत. यात ‘अ’ आणि व्हिटॅमिन सी जीवनसत्व असते. यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते तर व्हिटॅमिन सी देखील यामध्ये मुबलकप्रमाणात असते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

English Summary: Colorful cabbage on the market; Know properties and market prices
Published on: 25 January 2022, 05:13 IST