News

अकोला कृषी महाविद्यालयातील कृषी विद्यार्थी नेहमी शेतकऱ्यांच्या हितासाठी तत्पर असतात.

Updated on 26 September, 2021 6:30 PM IST

तसेच महाराष्ट्र सरकारने यावर्षी ई-पीक पाहणी सुरु केलं आहे. महसूल विभाग आणि कृषी विभागाच्यावतीनं ई-पीक पाहणी (माझी शेती, माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पिकपेरा) हा संयुक्त प्रकल्प राबवण्यात येत असून  पाहणी मोबाईल अँप द्वारे बंधनकारक केले असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना यासंदर्भात अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.गत वर्षीपासून कोरोनामूळे जनसामान्यासह बळीराज्याचे जीवन मेटाकूटीला आले आहे.अश्यात आपल्या परिवाराचे पालन पोषन करायचे कसे ? हा यक्षप्रश्न सर्वासमोर ऊभा ठाकले.असे असतांना यंदाच्या या खरिप हंगामात कसाबसा उभा झाला.

रोवणीही केली.निंदण खूरपण सुरु आहे.असे असतांना शासनाने"ई-पिक पाहणी" अॕप्सच्या माध्यमातून केली पिक पेऱ्याची नोंदणी करण्याच्या सूचना केल्या.ग्रामीण भागात अतीशय त्रासदायक असलेल्या या प्रक्रियेला विरोधही झाला.मात्र यासमोर शासनाच्या योजनेंपासून मुकावे लागणार असल्याच्या भितीने शेतकरीवर्ग  त्रास झाला तरी चाचपडत नोंदणी करतांना दिसून येत आहेत. ही बाब लक्षात घेऊन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठा अंतर्गत कृषि महाविद्यालय, अकोला येथील अंतिम वर्षाचे कृषि विद्यार्थी सौरव गायकवाड, कुणाल ठेंग, जीवन सोळुंके, अक्षय गवते,वैभव उगले, हर्ष तायडे आणि गोपाल उगले यांनी त्यांच्या (ग्रामीण जागृकता कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत)

अकोला तालुक्यातील येवता येथे शेतकऱ्यांना ई पीक  संदर्भात शेतकऱ्यांचा थेट शेतात जाऊन शेतकऱ्यांना ई- पीक पाहणी अँप कसे डाऊनलोड करावे, मोबाईल अँप कसे हाताळावे, आपली नोंदनी अँप वर कशी करावी, पिकाची माहिती कसी भरावी, फोटो काढताना ला परवानगी देणे, भरलेली माहिती अपलोड करणे, अपलोड केलेली माहिती सर्व का पोहोचली का याची पडताळणी कुठे करायची यासंदर्भात प्रत्यक्ष प्रात्याक्षिक करून दाखविले व माहिती दिली. विद्यार्थ्यांनी केलेल्या ई- पीक पाहणी प्रात्यशिकसाठी बरेच शेतकरी उपस्थित होते.

तसेच सदर  ई पीक पाहणी संदर्भात  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्यामसुंदर माने ,कार्यक्रम अधिकारी डॉ संदीप लांबे, डॉ. वैभव उज्जैनकर , डॉ गिरीश जेऊघाले, डॉ अनिल खाडे, व इतर शिक्षकांनी मार्गदर्शन केले.

­­-गोपाल उगले

English Summary: college of agriculture students gives demostratrion on e pik pahani to the farmers
Published on: 26 September 2021, 06:30 IST