डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत कृषि महाविद्यालय येथे आभाषी पध्दतीने राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला.
दि. २५ जानेवारी २०२२ रोजी कृषि महाविद्यालय, अकोला येथे 'राष्ट्रीय मतदार दिना'चे आयोजन करण्यात आले होते. सदर 'राष्ट्रीय मतदार दिन' कार्यक्रमाचे आयोजन कृषि महाविद्यालयामध्ये नव्याने स्थापन करण्यात आलेल्या Electoral literacy club यांनी केले.काय्रक्रमाच्या सुरुवातीला कर्मवीर डॉ.भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पण करूण दिपप्रज्वलन करण्यात आले.सदर काय्रक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य/ सहयोगी अधिष्ठाता मा.डॉ.श्यामसुंदर माने सर हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. काय्रक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन अकोला जिल्ह्याचे निवडणुक उपजिल्हाधिकारी माननीय श्री. मुकेश चव्हाण सर उपस्थित होते.
तसेच महा वोटर कॅम्पीयन चे नोडल अधिकारी, डाॅ अनिल खाडे व नोडल अधिकारी,लिटरसी क्लब डाॅ.शंभरकर सर, नोडल ऑफिसर डाॅ. अतुल झोपे सर व डाॅ. जोशी सर उपस्थित होते. या प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक डाॅ.संजय कोकाटे, डाॅ.दलाल ,डाॅ.प्रकाश गीते, डाॅ .गिरीश जेऊघाले, डाॅ,वाळके,डाॅ.भगत,डाॅ.धुळे,डाॅ.प्रेरणा चिकटे , डाॅ. गोदावरी गायकवाड हजर होते. इतर प्राध्यापक वृंद ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.या महाविद्यालया व्यतिरिक्त उद्यान विद्या व वनविद्या महाविद्यालयाचे प्राध्यापकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माननीय डाॅ. श्यामसुंदर माने सर यांनी विद्याथ्यांना मतदान यादीत नाव नोंदवण्याचे आव्हान केले. प्रमुख पाहुणे. माननीय चव्हाण सरांनी मोबाईल वरुण कश्याप्रकारे नाव नोंदणी करावी याचे मार्गदर्शन केले.
या 'राष्ट्रीय मतदार दिना' निम्मित निबंध व पोस्टर तयार करण्याच्या स्पर्धेचे आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये निबंध स्पर्धेत एकुण 70 विद्यार्थ्यांनी भाग घेतला तर पोस्टर तयार करण्याच्या स्पर्धेत 40 विद्यार्थ्यांनी भाग घेतला.निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक मयुरी खांबलकर हिने पटकावला, तर व्दितीय गंगासागर व तृतीय शिवप्रभा गुलवे ने पटकावला. प्रोत्साहन पर क्रमांक मोहद.उमैद मोहद. निसार व भाग्याश्री धोटे यांना मिळाला. पोस्टर बनवण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक सोनाली डोये,व्दितीय क्रमांक रोशनी परमार व तृतीय क्रमांक रुचिता भिसे व केतकी पाटील यांनी पटकावला. मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आभाषी पद्धतीने देण्यात आले. या कार्यक्रमामध्ये मतदान प्रतिज्ञा घेण्यात आली त्याचे वाचन व्दितीय वर्षातील विद्यार्थी विकास पायघान याने केले. या कार्यक्रमामध्ये सहभागी विद्यार्थ्यांचे पोस्टर मान्यवरांना दाखवण्यात आले. या कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालन धनश्री व्यवहारे हिने व रेणू कदम यांनी केले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रांजल चव्हाण हिने केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व सदस्यांनी खुप मेहनत घेतली.त्यामध्ये अनिकेत पजई, शिरिश तराळे, श्याम काले, राम चांडक,ओम बोदळे , शिवानी शेंडे, दिव्या तळेकर व इतर विद्यार्थींनी परिश्रम घेतले. कृषि महाविद्यालय अकोला, वनविद्या महाविद्यालय, अकोला,उद्यान महाविद्यालय, अकोला चे प्राध्यापक व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी - गोपाल उगले
Published on: 26 January 2022, 12:35 IST