महाराष्ट्रात गांजा हा चांगलाच चर्चेचा विषय बनत आहे गेल्या काही दिवसापूर्वी नगर जिल्ह्यात गांजाची शेती केल्याप्रकरणी शेतकऱ्यांवर कार्यवाही झाली, तसेच गेल्या पंधरवाडयात मराठवाड्यातील औरंगाबाद येथे एका शेतकऱ्याने गांजाचा मळा फुलवला होता त्यावर देखील पोलीस कार्यवाही करण्यात आली होती. आता ताजे प्रकरण हे मराठवाड्यातील बीड जिल्ह्याचे आहे. बीड जिल्ह्यातील येलंब गावातील हे प्रकरण आहे. येथील शेतकऱ्यांनी सामूहिकरीत्या गांजाची शेती केल्याचे प्रकरण सामोरे आले आहे
पोलिसांनी ह्या प्रकरणी चौकशी करत तीन लोकांना अटक केली आहे. बीड जिल्ह्यात ह्यापूर्वी देखील गांजाची शेती केल्याप्रकरणी कार्यवाही हि केली गेली होती तेव्हा त्या शेतकऱ्यापासून 1 क्विंटल 7 किलो गांजा हा जप्त करण्यात आला होता. आता हे दुसरे प्रकरण बीड जिल्ह्यात सामोरे आले आहे ह्या प्रकरणात स्थानिक पोलिसांनी तीन लोकांना अटक देखील केली आहे. देशात गांजाचे सेवन करणे, विक्री करणे, उत्पादन करणे, शेती करणे कायद्याने प्रतिबंधित करण्यात आले आहे तरीदेखील अतिरिक्त पैसे कमवण्यासाठी शेतकरी चोरून गांज्याची शेती करतात, महाराष्ट्रात देखील एवढ्या दोन महिन्याच्या काळात तीन-चार प्रकरण समोर आले आहेत आणि त्या संबंधित शेतकऱ्यांवर कार्यवाही देखील करण्यात आली आहे.
ह्या प्रकरणात तिघांना अटक
हे प्रकरण मराठवाड्यातील परळी वैजनाथ तालुक्यातील येलंब ह्या गावातील आहे. येलंब ह्या गावात स्थानिक पोलिसांना गांज्याच्या शेतीविषयी गुप्त सूत्रांद्वारे माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी चार ठिकाणी छापे टाकले, छापमारीत पोलिसांना गांज्याची शेती आढळून आली, पोलिसांनी कार्यवाही करत तिघांना अटक केली, तसेच 2 क्विंटल च्या आसपास गांजा आणि काही गांजाची रोपे जप्त केली. पोलीस ह्या प्रकरणात सखोल चौकशी करत आहे व त्यानुसार पुढील कार्यवाही करणार असे पोलिसांनी नमूद केले.
गांज्याची शेती केली तर शिक्षा काय
भारतात गांजा, भांग, चरस इत्यादी मादक पदार्थांचे सेवन करण्यावर कायद्याने बंदी आहे. ह्यासाठी भारतीय संसदेने नार्कोटिक्स ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक पदार्थ कायदा, 1985 संमत करून आमलात आणला आहे. हा कायदा भारताचे भूतपूर्व प्रधानमंत्री स्वर्गीय राजीव जी गांधी यांच्या काळात संमत करण्यात आला होता. या कायद्याने अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक रसायनांवर निर्बंध घातले गेले आहेत, ह्या कायद्याद्वारे अंमली पदार्थाचे उत्पादन, लागवड, खरेदी, साठवणूक, वाहतूक, सेवन, विक्री किंवा बाळगण्यास मनाई आहे असे केल्यास ह्या कायद्यात कार्यवाहीच्या तरतुदी देखील देण्यात आल्या आहेत. आपण त्या तरतुदी काय आहेत ते जाणुन घेऊया.
मित्रांनो ह्या कायद्याद्वारे असे नमूद केले गेले आहे की अमली पदार्थाचे सेवन, साठवणूक, विक्री किंवा उत्पादन अथवा लागवड केल्यास कठोर कार्यवाही केली जाईल. जर अमली पदार्थ हा कमी प्रमाणात आढळून आला तर सहा महिने पासुन तर एक वर्षापर्यंत कठोर/सक्त कारावास व दहा हजार रुपये दंडाची तरतूद आहे. तसेच, अमली पदार्थ हा जास्त प्रमाणात आढळला तर 20 वर्षापर्यंत कठोर कारावास आणि एक लाख रुपय दंड आकारला जाऊ शकतो. म्हणजेच गांज्याची शेती केली तर वीस वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते तसेच एक लाखापर्यंत दंड देखील आकारला जाऊ शकतो.
Published on: 02 November 2021, 07:07 IST