News

उत्तर भारतात आलेल्या थंडीच्या लाटेचा प्रवाह राज्यातील अनेक भागांपर्यंत आहे. त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर झाला आहे. यामुळे सर्वच भागातील किमान तापमानात घट झाली आहे. मंगळवारी सकाळी आठछ वाजेपर्यंत परभणी कृषी विद्यापीठ येथे ८.५ अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागाच्या सूंत्रांनी सांगितले.

Updated on 11 November, 2020 11:17 AM IST


उत्तर भारतात आलेल्या थंडीच्या  लाटेचा प्रवाह राज्यातील  अनेक भागांपर्यंत आहे. त्याचा परिणाम  राज्यातील वातावरणावर झाला आहे. यामुळे सर्वच भागातील किमान तापमानात घट झाली आहे. मंगळवारी  सकाळी आठछ वाजेपर्यंत परभणी कृषी विद्यापीठ येथे  ८.५ अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागाच्या सूंत्रांनी सांगितले. राज्यातील  सर्वच भागात थंडी वाढल्याने किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत ९ सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे. त्यामुळे  किमान तापमानात झपाट्याने घट झाली आहे.

विदर्भात ८ ते १३ अंश सेल्सिअस दरम्यान किमान तापमानाती नोंद झाली आहे. तर मराठवाड्यात ८ ते १४ अंश सेल्सिअस  किमान तापमान नोंदविले गेले. मध्य महाराष्टातही किमान तापमान चांगलीच घट झाली आहे. निफाड, पुणे, नाशिक, नगर, जळगाव भागात तापमान १० अंश सेल्सिअसच्या दरम्यान  असून  साधरणपणे या भागात १० ते १३ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आहे. सरासरीच्या तुलनेत  तीन अंश सेल्सिअसने तापमानात घट झाली असल्याचे सूत्रांनी सांगितले. यासह मुंबईतील सांताक्रुझ, बोरीवली, कांदिवली, मुलुंड, नेरुळ आणि पनवेल येथील  किमान तापमान २० अंश सेल्सिअसखाली  घसरले.

 


राज्यात सर्वाधिक कमी किमान तापमान चंद्रपूर येथे ८.६ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले. किमान तापमानाचा पारा अधिकाधिक घसरत असून मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात थंडीचा प्रभाव सर्वाधिक आहे. येथील तापमान सरासरीपेक्षा ५ ते ६ अंशाखाली नोंदविण्यात आले आहे.उद्या हवामानाची स्थिती कायम राहिल
, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पुण्यातही  तपामानाचा पारा  ८ अंशापर्यत खाली घसरले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान  यंदा २० डिसेंबर ते साधरणपण २० मार्च असा तीन महिन्याचा हिवाळा असणार आहे.

English Summary: Cold wave across the state, drop in temperature in all areas 11
Published on: 11 November 2020, 11:07 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)