उत्तर भारतात हुडहुडी भरवणारी थंडी; तर राज्यातील काही भागात थंडीची लाट

31 December 2020 12:07 PM By: भरत भास्कर जाधव
थंडीच्या लाटेची शक्यता

थंडीच्या लाटेची शक्यता

उत्तर भारतात थंडीची लाट पसरली आहे, यामुळे तापमानात चांगलीच घट झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवस या भागात थंडीची लाट राहणार आहे.


उत्तर भारतात थंडीची लाट पसरली आहे, यामुळे तापमानात चांगलीच घट झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवस या भागात थंडीची लाट राहणार आहे. हवामान विभागाच्या मते हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंडीगड,राजस्थान आणि उत्तर प्रदेशात हुडहुडी भरवणारी थंडी असणार आहे. दरम्यान यामुळे राज्यातील काही  भागात लाट येण्याची शक्यता असून थंडी वाढणार आहे.  बुधवार सकाळपर्यंत निफाड येथील निचांकी ११.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाने सांगितले.

 

गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतातील हिमवृष्टीचा वर्षाव होत असल्याने या भागात काही दिवसांपासून थंडीची लाट कमी अधिक प्रमाणात आहे. आजपासून हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंडीगड,राजस्थान आणि उत्तर प्रदेशात थंडीची लाट राहिल. आज आणि उद्या या भागात किमान तापमान ३ ते ५ अंश सेल्सिअसने घट होईल. राजस्थानच्या पश्चिम भागातील चुरू येथे उणे १.५ अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमानाची नोंदविले गेले.हवामान विभागाच्या मते राजधानी आणि भारताच्या अनेक राज्यात थंडी राहणार आहे. दिल्लीमध्ये पुढील दोन दिवस अधिक थंडी असणार आहे. दरम्यान राज्यात थंडी कमी अधिक स्वरुपात असली तरी काही भागात चांगलीच थंडी आहे.

कोकणातील अनेक भागात थंडीने जम बसविला आहे. सरासरीच्या तुलनेत दोन अंश सेल्सिअसने घट झाली आहे. त्यामुळे किमान तापमान १६ ते १८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. मध्य महाराष्ट्रातही थंडी बऱ्यापैकी असल्याने किमान तापमान १३ ते १६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान नगर, जळगाव, नाशिक, या भागात थंडी अधिक प्रमाणात आहे.


मराठवाड्यात थंडी असल्याने किमान तापमान ११ ते १८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. विदर्भातील काही भागात थंडी कमी झाली आहे. त्यामुळे किमान तापमनात सरासरीच्या तुलनेत एक ते तीन अंश सेल्सिअसने वाढ झाली आङे. या भागात किमान तापमान ११ ते १५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे.

northern India cold wave weather department थंडीची लाट उत्तर भारत हवामान विभाग
English Summary: Cold snap in northern India and cold wave in some parts of the state

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.