News

यावेळी केजे चौपालमध्ये मित्तल सहभागी झाले होते. तसंच यावेळी त्यांनी कार्यरत असणाऱ्या सीएनएच कंपनीबद्दलची माहिती दिली.

Updated on 04 August, 2023 5:56 PM IST

नवी दिल्ली

कृषी जागरणच्या आयोजित केजे चौपाल (KJ Chaupal) कार्यक्रमात देशातून आणि परदेशात विविध मान्यवर सहभागी होत असतात. यावेळी भेट देणारे मान्य शेतकरी, व्यापारी, बाजारभाव याबाबत विविध देशातील, राज्यातील, नवीन तंत्रज्ञान याबाबत माहिती देत असतात. आज (दि.४) रोजी कृषी जागरणच्या ऑफीसला सीएनएच इंडस्ट्रियलचे कंट्री मॅनेजर आणि एमडी नरिंदर मित्तल यांनी भेट दिली. तसंच मित्तल हे केजे चौपालमध्येही सहभागी झाले.

यावेळी कृषी जागरणचे संस्थापक आणि मुख्य संपादक एम.सी.डॉमनिक यांनी उपस्थित मान्यवर यांनी कृषी जागरण बदलची माहिती दिली. तसेच कृषी जागरणचा मूळ हेतू आणि उद्देश याबाबत सविस्तर माहिती देत उपस्थित मान्यवरांचा कृषी जागरणचे संस्थापक आणि मुख्य संपादक एम.सी. डॉमनिक यांनी सत्कार केला.

यावेळी केजे चौपालमध्ये मित्तल सहभागी झाले होते. तसंच यावेळी त्यांनी कार्यरत असणाऱ्या सीएनएच कंपनीबद्दलची माहिती दिली. ही कंपनी यांत्रिकीकरण निर्माण करणाचे काम करते. तसंच उत्तम प्रकारे आणि शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी ट्रॅक्टरची देखील निर्मिती करते.

सीएनएच हे औद्योगिक ब्रँड आहे. तसंच यामागे शेतीमागील प्रेरक शक्ती आहेत. शेती आणि बांधणीच्या उदात्त कार्यात त्यांनी आणलेले नावीन्य आणि कार्यक्षमता जागतिक अर्थव्यवस्थेच्या इतर क्षेत्रांना त्यांच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यास मदत करते.

नरिंदर मित्तल कोण आहेत?

नरिंदर मित्तल हे सीएनएच इंडस्ट्रियलचे कंट्री मॅनेजर आणि एमडी आहेत.सध्या ते 'एसएएसी'च्या (SAARC)च्या कृषी व्यवसायाचे नेतृत्व करत आहेत. १ जानेवारी २०२३ रोजी त्यांची नियुक्ती झाली आहे. CNH इंडस्ट्रियलमध्ये सामील होण्यापूर्वी, नरिंदर सोनालिका इंटरनॅशनल ट्रॅक्टर्सचे अध्यक्ष आणि कॉर्पोरेट हेड ऑफ ऑपरेशन्स होते. क्लास, फेडरल-मोगल आणि इतर ऑटोमोटिव्ह कंपन्यांमध्ये त्यांनी नेतृत्वाची भूमिका बजावली आहे.

English Summary: CNH MD Narinder Mittal's visit to Krishi Jagran
Published on: 04 August 2023, 05:06 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)