News

नैसर्गिक वायूच्या किमतींमध्ये वाढ झाल्यामुळे संपूर्ण देशभरात पुन्हा सीएनजी आणि पीएनजीच्या किमती मध्ये वाढ करण्यात आली असून मुंबईत किमती वाढल्या आहेत. तसेच गुजरात राज्यातील अहमदाबाद मध्ये देखील सीएनजी महाग झाला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला गेलने शहरातील गॅस कंपन्यांना पुरवल्या जाणाऱ्या नैसर्गिक वायूच्या किमतीत 18 टक्के वाढ जाहीर केल्यामुळे देशभरात सीएनजी आणि पीएनजीच्या किमती वाढू लागले आहेत. तसेच येणाऱ्या काळामध्ये आणखी काही शहरांमध्ये किमती वाढण्याची शक्यता आहे.

Updated on 03 August, 2022 9:21 AM IST

नैसर्गिक वायूच्या किमतींमध्ये वाढ झाल्यामुळे संपूर्ण देशभरात पुन्हा सीएनजी आणि पीएनजीच्या किमती मध्ये वाढ करण्यात आली असून मुंबईत किमती वाढल्या आहेत. तसेच गुजरात राज्यातील अहमदाबाद मध्ये देखील सीएनजी महाग झाला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला गेलने शहरातील गॅस कंपन्यांना पुरवल्या जाणाऱ्या नैसर्गिक वायूच्या किमतीत 18 टक्के वाढ जाहीर केल्यामुळे देशभरात सीएनजी आणि पीएनजीच्या किमती वाढू लागले आहेत. तसेच येणाऱ्या काळामध्ये आणखी काही शहरांमध्ये किमती वाढण्याची शक्‍यता आहे.

नक्की वाचा:मोठी बातमी: मिश्र खतांचे उत्पादन बंद होणार? राज्यातील आठ खत उत्पादकांना नोटीसा

 मुंबईत सीएनजी आणि पीएनजी महाग

 शहर गॅस वितरक महानगर गॅस लिमिटेडणे सीएनजीच्या दरात किलोमागे सहा रुपयांनी वाढ केली आहे, तसेच पाईप्ड नॅचरल गॅस अर्थात पीएनजीच्या दरामध्ये  तात्काळ चार रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आपण विचार केला तर ही दुसरी दरवाढ असून आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत नैसर्गिक वायूंच्या वाढत्या किमतीमुळे ही दरवाढ झाली आहे.

नक्की वाचा:२०२४ ला पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असणार? अमित शहांनी केली 'या' बड्या नावाची घोषणा..

त्यामुळे काही आठवड्यांपासून पुरवठादार आणि वितरकांना वाढत्या किमतीमुळे औद्योगिक पुरवठा कमी करावा लागला आहे. जर आपण एप्रिल महिन्याचा विचार केला तर ही सहावी दरवाढ आहे. यासंबंधी महानगर गॅस लिमिटेड यांनी एका निवेदनात म्हटले आहे की गॅसच्या किमतीत वाढ झाल्यामुळे आम्ही खर्च भरून काढण्याचा निर्णय घेतला आहे.

म्हणून आम्ही सीएनजी किरकोळ किंमत 86 रुपये प्रति किलो आणि देशांतर्गत पीएनजीची किंमत 52.50 प्रतियुनिट केली आहे. अहमदाबाद मध्ये देखील सीएनजीच्या किंमतीत 1.99 रुपयांनी वाढ केली असून त्याची किंमत आता 85.89 रुपये प्रति किलो झाली आहे.

नक्की वाचा:Market Situation:येणाऱ्या काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर उतरतील?कारण की….

English Summary: cng and png market price growth in maharashtra and whole india from today
Published on: 03 August 2022, 09:21 IST