प्रशांत डिक्कर यांच्या आक्रमकतेने महावितरण नरमले.
संग्रामपूर/ महावितरणने शेतकऱ्यांनकडुन चालु केलेली सक्तिची विज बिल वसुली थांबवा व बंद केलेले ट्रान्सफॉर्मर चालु करा या मागणीसाठी स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर यांनी शेकडो शेतकऱ्यांना घेऊन दि.२ फेब्रुवारी रोजी महावितरणच्या संग्रामपूर कार्यालयावर धडक दिली. रब्बी पिके तोंडाशी आले असतांना तालुक्यातील ५० ते ६० ट्रान्सफॉर्मर बंद करून विज बिलाच्या वसुलीसाठी
महावितरणने शेतकऱ्यांना पुर्णपणे वेठीस धरले होते. कांदा हरभरे सारखे सर्व पिके सुकण्याच्या मार्गावर असल्याने शेकडो शेतकऱ्यांनी धडक देत महावितरणचे अभियंता नवलकर यांच्या समोर प्रशांत डिक्कर यांनी शेतकऱ्यांची सर्व आपबिती कथन केली. अखेर महावितरणने नरमाईची भुमिका घेत बंद केलेले ट्रान्सफॉर्मर तत्काळ चालु करण्यात येणार असल्याचे सहायक अभियंता नवलकर यांनी लेखी आश्वासन देऊन आंदोलन स्थगित करण्यात आले. या वेळी यावेळी रोशन देशमुख,
जिल्हाध्यक्ष अनंता मानकर, तालुकाध्यक्ष उज्वल पाटील खराटे, विजय ठाकरे, योगेश मुरूख, संतोष गाळकर, योगेश वखारे, शिवा पवार, आशिष नांदोकार,कपिल गायकी, प्रविण येणकर, योगेश घायल, प्रविण पोपटनारे, आशिष सावळे, सुपडा सोनोने, रामकृष्ण गांवडे, महादेव चवरे, विठ्ठल वखारे, रवी चोपडे, गजानन रावणकार, विशाल चोपडे, दत्ता डिक्कर, ज्ञानेश्वर नांदने, गजानन कुरवाडे, दिलिप बोरसे, नयन इंगळे, गोलू पाटील, वासुदेव ठाकरे, गौरव जळमकार, वैभव मुरूख , विशाल मुरूख, गोकुळ गायकवाड, अमोल मारोडे,
आकाश कोठे, शेख साजीद, प्रफुल्ल करागळे, यांच्या सह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
अखेर महावितरणने नरमाईची भुमिका घेत बंद केलेले ट्रान्सफॉर्मर तत्काळ चालु करण्यात येणार असल्याचे सहायक अभियंता नवलकर यांनी लेखी आश्वासन देऊन आंदोलन स्थगित करण्यात आले.
Published on: 03 February 2022, 05:45 IST