Sindhudurag News :
हवामान बदलामुळे ऐन पावसाळ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा झाडांना मोहोर आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील भोगवे, किल्ले निवती भागात हापूस झाडाला फळे लागल्याचं चित्रं पहायला मिळत आहे. यामुळे आंबाच्या सिजन लवकर सुरु होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
भर पावसाळ्यात हापूस आंब्यांना मोहोर आल्याने थोडंस आश्चर्य सर्वांना वाटत आहे. तसंच हा मोहोर आंबा बागायतदारांनी आच्छादन टाकून टिकवून ठेवल्यास आंबा उत्पादकांना याचा नक्कीच फायदा होणार आहे.
ऑगस्टमध्ये पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत पडले असतानाच सिंधुदुर्गातील किनारपट्टी भागात आंबा झाडे मोहोरांनी फुलली आहेत. त्यामुळे शेतकरी काही प्रमाणात समाधानी दिसून येत आहेत.
पावसाळ्यात झाडांना आंबे लागल्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटत आहे. कारण भविष्यात मुसळधार पाऊस झाल्यास झाडाला लागलेले आंबे गळून जाण्याची शक्यता आहे. तसंच कीड लागण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे.
पाऊस लांबल्याचा परिणाम कोकणातील भातशेतीवर झाला आहे. त्याच बरोबर आंबा झाडांवर देखील झाला आहे. नोव्हेंबरमध्ये आंब्याचा झाडांना मोहर येतो. मात्र यंदा ऐन पावसाळ्यात मोहोर आला आहे. त्यामुळे आंबा उत्पादक काही प्रमाणात समाधानी आहेत.
दरम्यान, आंब्याच्या मोहरापासून पिकण्यापर्यंतच्या काळात झाडांची खूप काळजी घेतली जाते. तसंच हा आंबा शेडनेटमध्ये पिकवला जातो. आंब्याला मोहर लागल्यानंतर मोहरातील सर्वात चांगल्या कैरीच्या फळाची पुढील वाढीसाठी निवड केली जाते.
Published on: 14 September 2023, 05:12 IST