मी (राजू शेट्टी) राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या ग्राफिक्स वरील वक्तव्यावर दिलेल्या प्रतिक्रिया बद्दल नुकतेच धनंजय मुंडे यांनी दुरध्वनीवरून माझ्याशी संपर्क केला. सभागृहात बोललेला व्हिडिओ टाकून खुलासा केला.
यामध्ये त्या व्हिडिओत सभागृहामध्ये धनंजय मुंडे यांनी तसे बोलण्याचे दिसत नाही. पण सभाग्रहातील कृषिमंत्र्यांच्या वक्तव्यावर मी मांडलेली भूमिका ही योग्य असून शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकारचे धोरण चुकल्यामुळे दिवसेंदिवस शेतकरी आर्थिक संकटात सापडू लागला आहे.
कृषिमंत्री महोदय सरकारची बाजू घेऊन जरी बोलले असले तरी खताचे वाढलेले दर, बी -बियाणे किटकनाशके, अवजारे यांच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.
राज्यभर पावसाचा जोर वाढतच राहणार, हवामान खात्याने सांगितलं कारण...
याचा विचार करता वरील वस्तुस्थिती त्यांना मान्य करावीच लागेल. यामुळे कृषिमंत्री महोदयांनी शेतकऱ्याला केलेल्या मदतीचा ऊहापोह करण्यापेक्षा प्रिय मोदीजींना सांगून किमान हमीभावाचा कायदा करावा.
यापुढे माझा शेतकरी एक रुपयाचीही मदत सरकारकडे मागणार नाही, अशी पोस्ट स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे.
राज्यभर पावसाचा जोर वाढतच राहणार, हवामान खात्याने सांगितलं कारण...
ऊस तोडणी यंत्र वापरातील आव्हाने
भात लागवड तंत्रज्ञान
Published on: 25 July 2023, 02:33 IST