News

जुलै, २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्हयात उद्भवलेल्या पुरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या बाधित नागरिकांना मदत देण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळास सादर करण्यात आला होता. सदर प्रस्तावावर दिनांक २८.७.२०२१ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार प्रस्तुत प्रकरणी बाधित कुटुंबाना सानुग्रह अनुदान वाटप करण्यासाठी निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

Updated on 09 September, 2021 7:36 AM IST

मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अ) रू. ५०००/- प्रतिकुटुंब , कपडयांचे नुकसानीकरिता

ब) रू. ५०००/- प्रतिकुटुंब, घरगुती भांडी/वस्तु यांच्या नुकसानीकरिता

 

२. या सानुग्रह अर्थसहाय्यापैकी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरानुसार देय असलेल्या रु ५०००/- प्रति

कुटुंब ( रु २५००/- कपडयांचे नुकसानीकरिता व रु २५००/- घरगुती भांडी/वस्तु यांच्या नुकसानीकरिता ) या

दराने मदत वाटप करण्यास होणारा खर्च राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधुन लेखाशीर्ष २२४५०१५५ अंतर्गत उणे

प्राधिकारावर काढण्यास यापुर्वीच परवानगी देण्यात आली आहे.

 

३. वरील नमुद सानुग्रह अर्थसहाय्यापैकी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरापेक्षा जास्त होणारा रु ५०००/-

प्रति कुटुंब इतका वाढीव खर्च राज्य शासनाच्या निधीमधुन लेखाशीर्ष २२४५२१९४ या लेखाशीर्षामधुन

करण्यात यावा. या प्रयोजनाकरिता या शासन निर्णयासोबत जोडलेल्या विवरणपत्राप्रमाणे संबंधित जिल्हयांना

आगाऊ स्वरुपात रु ४६५८.३३ लक्ष ( रु शेहचाळीस कोटी अठ्ठावन्न लक्ष तेहतीस हजार फक्त) इतकी रक्कम

वितरीत करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. सदर निधी कार्यासन म-११ यांनी संबंधित विभागीय

आयुक्तांना वितरीत करावा.

 

४. उक्त प्रयोजनाकरिता येणारा खर्च मागणी क्र.सी-०६, मुख्य लेखाशीर्ष २२४५ नैसर्गिक आपत्ती निवारणार्थ

सहाय्य, ०२ पूर चक्रीवादळे इत्यादी (९२), राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मानकांव्यतिरिक्त खर्च, (९२(०१) रोख

भत्ता, मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना साहाय, ३१ सहाय्यक अनुदाने (२२४५ २१९४) या लेखाशीर्षाखाली खर्ची

टाकण्यात यावा.

 

 

५. पंचनामे करण्यात आल्यानंतर लाभार्थी निश्चित करण्यात यावेत. मदतीसाठी शासनाकडुन निधी वितरित करण्यात आल्यानंतर रक्कम आहरित करून लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट हस्तातंरित करावी. रोखीने रक्कम कोणत्याही परिस्थितीत प्रदान करण्यात येऊ नये. कोषागारातुन अनावश्यकरित्या निधी आहरित करून बँक खात्यामध्ये काढून ठेवण्यात येवू नये. लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पुर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व

मदतीचा तपशील जिल्हयांच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात यावा.

 

स्रोत - आम्ही शेतकरी

 

English Summary: Citizens of 19 districts will get Rs. 10000 thousand
Published on: 09 September 2021, 07:36 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)