1. बातम्या

सीआयसीआरने विकसित केली कापूस वेचणी बॅग

KJ Maharashtra
KJ Maharashtra
सीआयसीआरने विकसित केली कापूस वेचणी बॅग

सीआयसीआरने विकसित केली कापूस वेचणी बॅग

 कापूस वेचणी म्हटली म्हणजे सर्वाधिक कष्ट असतील तर त्या महिला वर्गाचे, दिवसभर वाकून कापूस वेचणी हे फार जिकीरीचे काम असते. महिला वर्गाचे हे कष्टाचे काम थोडे बहुत कमी करण्याच्या उद्देशाने केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने कापूस वेचणी बॅग विकसित केली आहे.

या बॅगेचे वैशिष्ट्य म्हणजे या बागेची क्षमताही सात किलो कापूस एवढी आहे. तसेच स्वच्छ कापूस उत्पादनाला त्‍यामुळे हातभार लागणार आहे. या बॅगेच्या  शासकीय खरेदी कामी  ही गव्हर्नमेंट मार्केट प्लेस वर देखील ही बॅग उपलब्ध राहणार आहे. या बॅगेचा  उत्पादन करा र नागपुरातील मेसर्स एम एस आर इंटरप्राईजेस सोबत करण्यात आला आहे.

 

विशेषतः महिलांना या कामात फार अडचणी चा सामना करावा लागतो. हे लक्षात घेऊनच कापूस संशोधन संस्थेच्या अंतर्गत असलेल्या केवीके च्या वतीने खास वेचणी केलेल्या कापसाच्या तात्पुरत्या साठवणुकीसाठी बॅग विकसित केली गेली आहे. या बॅगच्या देशांतर्गत व्यावसायिक वापरास मान्यता देण्यात आली आहे.सध्या या बॅगेच्या  उत्पादन संदर्भात करा रहा मेसर्स एस एस आर एंटरप्राइजेस  सोबत करण्यात आला आहे.

त्याशिवाय इतर व्यावसायिकांनी देखील या कामासाठी पुढे यावे असे आवाहन केंद्रीय कापूस संशोधन संस्थांनी केले आहे. ही बॅग घालण्यास सोपी उच्च कार्यक्षमता असलेली, स्वच्छ कापूस वेचणी पूरक असल्याचा दावा करण्यात आलाआहे.

 संदर्भ- ॲग्रोवन

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters