News

सोलापूर: रिझर्व बँकेच्या नवीन निकषानुसार आता शेतकऱ्यांना पीक कर्ज वामध्यम व दीर्घ मुदतीच्या खर्चासाठी सिबील निकष लागू करण्यात आला आहे. कर्जाची परतफेड नियमित असण्यावर संबंधिताची पत ठरवली जात आहे

Updated on 20 October, 2021 6:39 PM IST

सोलापूर: रिझर्व बँकेच्या नवीन निकषानुसार आता शेतकऱ्यांना पीक कर्ज वामध्यम व दीर्घ मुदतीच्या खर्चासाठी सिबील निकष लागू करण्यात आला आहे. कर्जाची परतफेड नियमित असण्यावर संबंधिताची पत ठरवली जात आहे

.ज्यांच्या सिबिल स्कोर 600 ते 700 पर्यंत असेल असे शेतकऱ्यांनाच बँका कर्ज वाटप करीत आहेत.

अगोदर बँकेकडून कर्ज घ्यायचे असेल तर संबंधित जमिनीचा सातबारा,8अ चा उतारा,पॅन कार्ड, आधार कार्ड व सोबतच अन्य कोणत्याही बँकेचे कर्ज नसल्याचा निल दाखला द्यावा लागत होता.परंतु आता यासोबतच यामध्ये बदल करून आता सिबिल याची पडताळणी बंधनकारक करण्यात आलीआहे.

बँका आता संबंधाचे पत ऑनलाईन पद्धतीने शिबिराच्या माध्यमातूनठरवत आहेत. यासाठी रिझर्व्ह बँकेने चार कंपन्यांसोबत करार केला असून या कंपन्यांच्या माध्यमातून कर्जदारांची पत पडताळली जात आहे.

सिबिल म्हणजे काय?

 शेतकरी असो वा एखादा नोकरदार यांनी कुठल्याही बँकेकडून कर्ज घेतले असेल किंवा संबंधित व्यक्ती कोणाला जामीनदार असेल तर त्याचे संपूर्ण माहिती आता बँकांन सिबिलच्या  माध्यमातून समजू लागले आहे. 

कोणत्याही बँकेकडून कर्ज घेतले असेल व त्याचे हप्ते नियमित फरक पडत असतील तर तो शेतकरी  कर्ज घेण्यासाठी पात्र ठरतो.थकबाकी असल्याने कर्ज वाटप करता येत नाही. एखादी व्यक्ती कोणत्या बँकेचे थकबाकीदार आहे का किंवा ज्या व्यक्तीला जामीनदार आहे ती व्यक्ती नियमित कर्जफेड करत आहे का यासंबंधीची माहिती या सिबिलच्या माध्यमातून कळते.

English Summary: cibil score nessesary for crop loan for all farmer
Published on: 20 October 2021, 06:39 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)