News

ऊस वाहतूकदार व ट्रॅक्टर हे खूप धोकादायक पद्धतीने ऊस वाहतूक करतात. त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. हीच गोष्ट लक्षात घेऊन अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी ग्रामपंचायतने एक अनोखी शक्कल लढवली आहे. काष्टी ग्रामपंचायतने गावातील चौका-चौकात ऊस वाहतूकदारांना इशारा देणारे फलकच लावले आहेत.

Updated on 22 November, 2022 9:49 AM IST

ऊस वाहतूकदार व ट्रॅक्टर हे खूप धोकादायक पद्धतीने ऊस वाहतूक करतात. त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. हीच गोष्ट लक्षात घेऊन अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी ग्रामपंचायतने एक अनोखी शक्कल लढवली आहे. काष्टी ग्रामपंचायतने गावातील चौका-चौकात ऊस वाहतूकदारांना इशारा देणारे फलकच लावले आहेत.

श्रीगोंदा तालुक्यात चार साखर कारखाने आहेत, तर बाजूच्या दौंड तालुक्यात दोन साखर कारखाने आहेत, त्यामुळे तालुक्यातून मोठ्या प्रमाणामध्ये ऊस वाहतूक होत असते. त्यातच काष्टी हे गाव महामार्गावर असल्याने या रस्त्याने दरवर्षी मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक होते. धोकादायक पद्धतीने ऊस वाहतूक केली तर चोप देण्याचा इशाराच ग्रामपंचायतने दिला आहे.

इलेक्ट्रिक कारचे स्वप्न पूर्ण होणार! फक्त ₹ 2000 मध्ये बुक करा कार; लुक, डिझाइन आणि फीचर्स खास

1. उस वाहतूक सुरू असताना ऊस वाहतूकदार मोठ्या आवाजात टेप रेकॉर्डर लावतात.
2. तसेच ट्रॅक्टर किंवा ट्रकला रिफ्लेक्टर लावत नाहीत.
3. अतिशय वेगानं वाहनं चालवतात. त्यामुळे या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले आहेत.

LPG गॅस सिलेंडरवर 50 लाखांचा विमा मिळतो; तुम्हाला क्लेमची प्रक्रिया माहित आहे का?

अशा अपघातात दरवर्षी तालुक्यातील 50 जणांचा बळी जात असल्याच काष्टी ग्रामस्थांनी सांगितले आणि म्हणूनच काष्टी ग्रामपंचायत एक ठराव करून चौका - चौकात सूचना आणि इशारा देणारे फलक लावले आहेत. एवढंच नाही तर नियमांचे पालन केले नाही तर चोप देण्याचा इशाराच दिला आहे.

याबाबत संबंधित प्रशासन कारवाई करत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे आणि म्हणूनच ग्रामस्थांना हे टोकाचे पाऊल उचलण्याची वेळ आल्याचं ग्रामस्थ सांगत आहेत.

कारखान्याने देखील अशा पद्धतीने वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांचा ऊस हा खाली करून न घेतल्यास धोकादायक पद्धतीने ऊस वाहतूक करणाऱ्यांना चाप बसेल असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींदरम्यान अर्थमंत्र्यांनी केली मोठी घोषणा, वाचून आनंद होईल...

English Summary: Chop will be given to all sugarcane transporters and tractor drivers!
Published on: 22 November 2022, 09:49 IST