News

देशातील अनेक शेतकरी बांधव पारंपारिक पीक पद्धतीला फाटा देत नगदी पिकांची लागवड करून बक्कळ पैसा कमवीत असतात. पारंपारिक पिकाची लागवड करून शेतकरी बांधवांना अपेक्षित उत्पादन व उत्पन्न प्राप्त होत नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांना पारंपारिक पीक पद्धतीला मागे टाकत बाजारात मागणी असलेल्या पिकांची लागवड करणे गरजेचे झाले आहे. राज्यातील अनेक शेतकरी बांधव पीक पद्धतीत बदल करताना बघायला मिळत आहेत.

Updated on 10 February, 2022 9:56 PM IST

देशातील अनेक शेतकरी बांधव पारंपारिक पीक पद्धतीला फाटा देत नगदी पिकांची लागवड करून बक्कळ पैसा कमवीत असतात. पारंपारिक पिकाची लागवड करून शेतकरी बांधवांना अपेक्षित उत्पादन व उत्पन्न प्राप्त होत नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांना पारंपारिक पीक पद्धतीला मागे टाकत बाजारात मागणी असलेल्या पिकांची लागवड करणे गरजेचे झाले आहे. राज्यातील अनेक शेतकरी बांधव पीक पद्धतीत बदल करताना बघायला मिळत आहेत.

मात्र असे असले तरी, अद्यापही अनेक शेतकरी पारंपारिक पीक पद्धतीतच अडकलेले बघायला मिळतात. आज आपण कृषी जागरणाच्या वाचक मित्रांसाठी चिया सीड्स विषयी माहिती घेऊन आलो आहोत. चिया सीड्स ची लागवड राज्यातील अनेक शेतकरी करीत आहेत व त्यातून दर्जेदार उत्पादन देखील प्राप्त करीत आहेत. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया चिया सिड्स नेमके काय आहे आणि यातून उत्पादन कसे मिळते. चीया सीडचे उत्पादन घेत असलेल्या शेतकऱ्यांच्या मते, चिया सीड्स लागवड केल्यापासून अवघ्या तीन महिन्यांत उत्पादन देण्यास सज्ज होते. तसेच चीया सीडमध्ये औषधी गुणधर्म असल्याने बाजारपेठेत चीया सिड्सची मागणी सदैव बनलेली असते. 

त्यामुळे चीया सिड्सची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत असल्याचे सांगितले जात आहे. चिया सीड्स हे इतर खाद्य बियाप्रमाणेच आहे. यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात तसेच या बिया आकाराने अगदी लहान असतात, चीया सीड्स हे तपकिरी पांढरा आणि काळ्या रंगाचे असते. चिया सीड्स मध्ये पोटॅशियम,फायबर, तांबे जास्त यांसारखे अनेक खनिज देखील भरपूर प्रमाणात असल्याने याचे सेवन मानवी आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. चिया सीड्स ची शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे कारण की लागवड केल्यापासून अल्प कालावधीतच हे पीक काढणीसाठी तयार होते. 

तज्ञांच्या मते, दोन महिने आणि पंधरा दिवसात हे पीक उत्पादन देण्यास सज्ज होत असते. या पिकाच्या लागवडीसाठी एकरी बारा हजार रुपयांपर्यंतचा खर्च अपेक्षित असतो आणि या पिकातून एकरी दोन लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त होते. म्हणजे या पिकातून एक लाख 80 हजार रुपयेच्या आसपास निव्वळ नफा शेतकरी बांधव प्राप्त करू शकतात. चिया सीड्स ला बारामाही मागणी असल्याने याची शेती शेतकरी बांधवांसाठी वरदान सिद्ध होऊ शकते.

English Summary: chiya seeds farming is very hepful for farmers
Published on: 10 February 2022, 09:56 IST