Solapur News : गिरणगाव म्हणून सोलापूरची ओळख सर्वत्र आहे. कापड उद्योगाच भांडार म्हणून सोलापूरची सर्वांना ओळख आहे. यामुळे या भागात पूर्वीपासून वस्त्रोउद्योग आणि सुत गिरण्या होत्या. पण काळाप्रमाणे या भागातील गिरण्या बंद होत गेल्या. पण कापड उद्योगाची एक आशा सोलापूरमध्ये अजून होती. ती म्हणजे लक्ष्मी विष्णू मिलची चिमणी पण स्थानिक प्रशाननाने ती देखील आता जमीनदोस्त केली आहे. यामुळे कापड गिरण्यांमधील कामगारांनी दु:ख व्यक्त केले आहे. स्थानिक प्रशासनाने धोकादायक वास्तु म्हणून ही चिमणी पाडली आहे.
लक्ष्मी विष्णू मिलची चिमणी पाडतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे. याआधी देखील सोलापूरमधील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पडतानाचा व्हिडीओ ज्या प्रमाणे व्हायरल झाला होता तसाच चिमणी पाडतानाचा देखील व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
लक्ष्मी मिलच्या जागेवर असलेली ५० मीटर उंच चिमणी ही धोकादायक स्थिती होती. त्यामुळे स्थानिक प्रशासन महानगरपालिकेकडून याबाबत पाहणी करण्यात आली. त्यानंतर प्रशासनाच्या लक्षात आले की चिमणी एका बाजूला कलली असल्याने ही धोकादायक बनली आहे. यामुळे चिमणी धोकादायक स्थितीत असल्याचा निष्कर्ष काढून पालिका प्रशासनाने ही चिमणी पाडून टाकण्याबाबत नोटीस बजावली. त्यानुसार सुमारे १२५ वर्षांची चिमणी मुंबईतील एका ठेकेदारामार्फत जमीनदोस्त करण्यात आली.
विष्णू मिलची चिमणी पाडताना आम्हाला आनंद झाला नाही. मात्र ही चिमणी धोकादायक बनली होती. ती कधीही पडून इतरांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. त्यामुळे संबंधित चिमणी पाडण्यात आली. तसंच तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार ही चिमणी ३ डिग्रीमध्ये झुकली होती. त्यामुळे ती पाडावी लागली, अशी माहिती एका प्रसारमाध्यमाला जागा मालक महेश भंडारी यांनी दिली आहे.
Published on: 31 May 2024, 11:29 IST