सध्या जगभरात कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. असे असताना आता कोरोनाचा सामना करत असताना आता श्रीलंकेतील नागरिक महागाईमुळे हैराण झाले आहेत. यामुळे हा देश भयानक परिस्थितीतून जात आहे. श्रीलंका जवळपास दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. देशात मिरची ७१० रुपये किलो, बटाटा २१० किलो रुपये झाला आहे. यामुळे आपल्याला या महागाईचा अंदाज येईल. तसेच वांग्याच्या दरात ५१ टक्के, तर कांद्याच्या भावात ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. आयातीअभावी येथे लोकांना दुधाची पावडरही देशात मिळत नाही. यामुळे पाकिस्तानपेक्षा भयानक परिस्थिती आता श्रीलंकेत झाली आहे. यामुळे याची सध्या चर्चा सुरु आहे.
येथे एक किलो बटाट्याचा भाव २०० रुपयांच्या आसपास पोहोचला आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना श्रीलंकेत राहणे कठीण झाले आहे. आधीच कोरोनाने थैमाण घातले आहे आणि महागाईनेही आता त्यांचे कंबरडे मोडले आहे. मात्र यावर सरकार गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. तसेच खाद्यपदार्थांच्या किमती 15 टक्क्यांनी वाढल्याचे सांगण्यात आले आहे. गेल्या वर्षी 30 ऑगस्ट रोजी श्रीलंका सरकारने चलनाच्या किमतीत तीव्र घसरण झाल्यानंतर राष्ट्रीय आर्थिक आणीबाणी घोषित केली होती.
आता अन्नधान्याच्या किमतीत मोठी वाढ झाली. चीनसह अनेक देशांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यात श्रीलंकेला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच देशात मोठी आर्थिक मंदी देखील आल्याचे दिसून येत आहे. श्रीलंकेत 100 ग्रॅम मिरचीची किंमत 18 रुपये होती, ती आता 71 रुपये झाली आहे. म्हणजेच एक किलो मिरचीचा भाव 710 रुपयांवर गेला आहे. मिरचीच्या भावात एकाच महिन्यात २८७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. याची झळ थेट सर्वसामान्य लोकांना बसत आहे. यामुळे सरकारवर नागरिक चिडून आहेत.
सरकारचे कोणतेही आर्थिक नियोजन नसल्याचे अनेकांनी म्हटले आहे. तसेच विरोधक देखील सरकारवर टीका करत आहेत. 2014 पासून श्रीलंकेवरील विदेशी कर्जाच्या पातळीही सातत्याने वाढ होत आहे. 2019 मध्ये हे कर्ज देशाच्या जीडीपीच्या 42.6 टक्क्यांवर पोहोचले होते. यामुळे देशात पुढील काळात अजून भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच देशात कोबी 240 रुपये किलो, गाजर 200 रुपये किलो, कच्ची केळी रु 120 किलो, टोमॅटो 200 रुपये किलो असे भाव वाढले आहेत. यामुळे येणाऱ्या काळात देखील हे भाव वाढण्याची शक्यता आहे.
Published on: 13 January 2022, 12:26 IST