News

काळाच्या ओघात शेतकऱ्यांनी पीक बदल करणे गरजेचे आहे तसेच पिकेल तेच विकेल ही भूमिका जर शेतकऱ्यांनी घेतली तर उत्पादनात तसेच उत्पन्नात वाढ होणार आहे. ज्या शेतकऱ्याला बाजारपेठेत काय महत्वाचे आहे ते समजले त्यांना जास्तीत जास्त फायदा झालेला आहे. मागील दोन वर्षात शेती क्षेत्रामध्ये मोठा बदल झालेला आहे जो की हाच बदल भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील हरदोली गावातील शेतकऱ्याने स्वीकारून भाजीपाल्याची लागवड केली आहे. सेवकराम या शेतकऱ्याला बाजारपेठेचे महत्व कळलेच आहे जे की त्यांनी पिकवलेली मिरचीने राजधानी दिल्लीतील बाजारपेठेत ठसका उडवलेला आहे. दिल्ली च्या बाजारपेठेत मागणी असल्याने व्यापारी स्वतः शेतात येऊन मिरची खरेदी करत आहेत.

Updated on 11 February, 2022 6:49 PM IST

विक्री व्यवस्थेच्या जोरावर भाजीपाला :-

फायदा तसेच तोट्याचा विचार न करता शेतकरी पारंपरिक पिकांवर भर देत आहेत जे की यामुळे शेतजमिनीचा तर दर्जा खालावत आहेच पण त्याचसोबत उत्पादनातही घट होत आहे. बाजातपेठेत तसेच नागरिकांची गरज लक्षात घेऊन जर उत्पादन घेतले तर काय होईल हे हरदोली गावातील सेवकराम झंझाड यांनी दाखवले आहे. बाजारपेठेतील गरज लक्षात घेऊन सेवकलाल यांनी भाजीपाला लागवड करून यशस्वीपणे उत्पादन घेतले आहे. मिरची लागवड करून चांगल्या प्रमाणत उत्पादन पदरी पाडले आहे.

पारंपरिक शेतीतून नुकसानच :-

पूर्वी सेवकराम झंझाड आपल्या शेतात धानाचे पीक घेत होते मात्र या पारंपरिक पिकामधून सेवकराम यांच्या पदरी जो पिकाला खर्च गेला आहे तो सुद्धा पदरी पडत न्हवता त्यामुळे त्यांनी कृषी विभागाचा सल्ला घेऊन मिरचीचा प्रयोग अवलंबिला. आता त्यांनी पिकवल्याली मिरची थेट दिल्लीच्या बाजारपेठेत दाखल होत आहे त्यामुळे आता पर्यंत जेवढे शेती व्यवसायातून नुकसान झाले आहे ते नुकसान मिरची भरून काढत आहे. हिरव्या मिरची ला दिल्लीमध्ये मागणी वाढल्याने दरही चांगले वाढले.

व्यापारी थेट बांधावर :-

तुमचा माल जर दर्जेदार असेल तसेच बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी असेल तर काहीही होऊ शकते हे आपल्याला मिरची च्या मागणीवरून दिसतच आहे. मिरचीला मागणी असल्यामुळे व्यापारी थेट शेताच्या बांधावर येऊन माल खरेदी करत आहेत. यामुळे वाहतुकीचा सुद्धा खर्च वाचला. मिरची जोपासायला सेवकराम याना खूप कष्ट करावे लागले पण दर भेटल्याने उत्पन्न चांगलेच पदरी पडले आहे.

English Summary: Chilli thasakka in Bhandara district, happy atmosphere among chilli growers
Published on: 11 February 2022, 06:48 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)