1. बातम्या

बाजारात मिरचीचे भाव वाढले , मागच्या तीन दिवसात तब्बल १५ हजार क्विंटलची आवक

किरण भेकणे
किरण भेकणे
Chilli

Chilli

यावर्षी पावसाने जोरदारपणे आगमन केल्याने अनेक पिकांची वाट लागली मात्र नंदुरबार जिल्हा   आणि  त्याला जे  लगतचे जे  जिल्हे  आहेत  त्या  जिल्ह्यांमध्ये   मिरची  चांगलीच   तरलेली  आहे. उन्हाळ्यात मिरचची लागवड केली होती आज तीच मिरची नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत थैमान घालत आहे. मागील ३ दिवसांमध्ये सुमारे १५ हजार क्विंटल मिरची ची  आवक झालेली आहे.

यंदा मिरची विक्रमी उत्पादन देणार:

त्यामुळे जरी इतर पिकांनी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले असले तर मिरची ने शेतकऱ्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू आणले आहेत. मिरची खरेदीसाठी फक्त नंदुरबार  जिल्ह्यातील  किंवा लगतच्या जिल्ह्यातील च न्हवे तर परराज्यातून सुदधा व्यापारी मिरची खरेदी साठी येतात.नंदुरबार जिल्ह्यामध्ये पोषक वातावरण असल्यामुळे यंदा मिरची विक्रमी उत्पादन देणार असा अंदाज व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पाण्याचा अंदाज बघता मे महिन्यात मिरची ची कागवड केली ने की पावसात सुद्धा मिरची च्या रोपांची आपली स्थिती चांगली ठेवली असल्याने फळे जास्त प्रमाणात आली मागील महिन्यापासून मिरची ची तोडणी सुरू झाली असून सप्टेंबर महिन्यापासून बाजारात लाल मिरची येऊ लागली आहे तर समितीमध्ये दिवसेंदिवस मिरचीची आवक वाढतच निघालेली आहे.

दिवसात पंधरा हजार क्विंटल मिरची आवक:-

नंदुरबार जिल्ह्यात मे महिन्यात मिरची ची लागवड केली जाते. अगदी लागवडीपासून त्याला  जोपासणे  वेळेवर  खत देणे, पाणी  देणे  याचा सर्व  अंदाज  शेतकऱ्यांना  आलेला  आहे. यावर्षी पावसामुळे मिरचीच्या उत्पादनात घट होईल अशी भीती निर्माण झालेली होती मात्र उत्पादनात घट न होता वाढ झाली. मागच्या ३ दिवसात बाजारपेठेत  सुमारे  १५  हजार  क्विंटल  मिरचीची आवक झालेली आहे.

आवकही वाढली अन् दरही:-

सर्वसाधारण पणे आवक वाढली की दर घसरले जातात पण मिरचीच्या बाबतीत असे पहायले दिसत नाही. जेवढी आवक आहे त्यापेक्षा जास्त नंदुरबार बाजारामध्ये मिरचीची मागणी आहे. नंदुरबार ची अशी एक बाजारपेठ आहे जे फक्त लगतच्या जिल्ह्याला न्हवे तर परराज्यात सुद्धा प्रसिद्ध आहे. नंदुरबार बाजारातील मिरची खरेदी करण्यासाठी गुजरात, मध्यप्रदेश मधील व्यापारी वर्ग येतात.

यंदाही दर वाढण्याची शक्यता:-

मागील वर्षी मिरचीला बाजारात २ हजार ते ३५०० प्रति क्विंटल असा भाव मिळाला होता तर यावर्षी त्यापेक्षा जास्तच भाव मिळेल असा अंदाज कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी वर्गाने लावलेला आहे.

Like this article?

Hey! I am किरण भेकणे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters