मिरचीसाठी सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून नंदुरबार च्या बाजारपेठेची ओळख आहे. नंदुरबार मध्ये फक्त जिल्ह्यातील च मिरची नाही तर शेजारच्या राज्यातून सुद्धा मिरची दाखल होते. यंदा वातावरणाच्या लहरीपणामुळे पिकांच्या उत्पादनात घट झाली त्यामुळे लाल मिरचीला विक्रमी दर मिळाला. लाल ओल्या मिरचीला ९ हजार दर तर कोरड्या मिरचीला १७५०० रुपये दर मिळाला. जरी दर वाढले असले तरी उत्पादनात घट झाली असल्याने याचा जास्त फायदा शेतकऱ्याना होणार नसल्याचे सांगितले जात आहे. भविष्यात मिरची ची आवक घटली अजून दर वाढतील असे सांगितले आहे. नंदुरबार च्या बाजारपेठेत आपणास हे चित्र पाहायला भेटत आहे.
बाजारात तेजी, उत्पादनात मात्र घट :-
मिरचीला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असेल असे तुम्हाला वाटत असेल पण हा तुमचा गोड गैरसमज आहे जे की वातावरणाच्या लहरीपणामुळे मिरची उत्पादनात निम्यापेक्षा अधिकची घट झालेली आहे त्यामुळे जरी दर वाढला असला तरी म्हणावा असा फायदा शेतकऱ्यांना झालेला नाही. सध्या बाजारात ओल्या मिरचीसह कोरड्या मिरची ची सुद्धा आवक सुरू झाली आहे. लाल ओल्या मिरचीला बाजारामध्ये ३५०० कमाल तर ८५०० किमान असा भाव भेटत आहे. असे विक्रमी जरी दर असले तरी सुद्धा शेतकऱ्याना उत्पादनात घट झाल्यामुळे फायदा भेटत नाही.
1लाख 65 हजार क्विंटल मिरचीची आवक :-
नंदुरबार ची बाजारपेठ ही मिरचीसाठी मुख्य बाजारपेठ म्हणजन6ओळखली जाते जे की फक्त जिल्ह्यातून च न्हवे तर दुसऱ्या राज्यातुन सुद्धा या बाजारपेठेत मिरची ची आवक होते. ओल्या मिरची ची तोडणी झाली की लगेच त्याची विक्री करावी लागते. आता पर्यंत मिरची ची १ लाख ६५ हजार क्विंटल आवक झालेली आहे. जरी आकडेवारी मोठी वाटत असली तरी मिरची च्या उत्पादनात निम्यापेक्षा जास्त च घट झालेली आहे जो की भविष्यात असा परिणाम दिसणार आहे. शेतकऱ्यांनी वाळलेल्या मिरची ची साठवणूक करण्यापेक्षा विक्रीवर जास्त भर दिलेला आहे.
दक्षिण भारतात उत्पादनात घट :-
दक्षिण भारतातील राज्यातून सुद्धा नंदुरबारच्या बाजारपेठेत मिरची ची आवक होत आहे. नंदुरबार बाजारामध्ये योग्य व्यवहार तसेच दर सुद्धा चांगले असल्याने मिरची उत्पादक नंदुरबारच्या बाजारपेठेला जवळ करत आहेत. यंदा च्या वर्षी वातावरणाच्या लहरीपणामुळे सर्वच पिकांची अवस्था बिकट झालेली आहे. मिरची पिकाच्या उत्पादनात ही मोठ्या प्रमाणात यामुळे घट झालेली आहे. या घटत्या उत्पादनामुळे दरात अजून विक्रमी वाढ होईल असे सांगण्यात आले आहे.
Published on: 14 February 2022, 07:15 IST