News

रोजच्‍या आहारात मिरची ही अत्‍यावश्‍यक असते. बाजारात हिरव्‍या मिरचीस वर्षभर मागणी असते. याखेरीज भारतीय मिरचीस परदेशातूनही चांगली मागणी आहे. महाराष्‍ट्र मिरचीची लागवड अंदाजे 1 लाख हेक्‍टरी क्षेत्रावर होते. मिरचीमध्‍ये अ व क जीवनसत्‍व भरपूर प्रमाणात असते. तिखटपणा व चवीमुळे महत्‍वाचे मसाला पिक आहे.

Updated on 28 November, 2023 4:42 PM IST

रोजच्‍या आहारात मिरची ही अत्‍यावश्‍यक असते. बाजारात हिरव्‍या मिरचीस वर्षभर मागणी असते. याखेरीज भारतीय मिरचीस परदेशातूनही चांगली मागणी आहे. महाराष्‍ट्र मिरचीची लागवड अंदाजे 1 लाख हेक्‍टरी क्षेत्रावर होते. मिरचीमध्‍ये अ व क जीवनसत्‍व भरपूर प्रमाणात असते. तिखटपणा व चवीमुळे महत्‍वाचे मसाला पिक आहे.

हवामान -
मिरची पिकाची लागवड पावसाळा, उन्‍हाळा आणि हिवाळा या तीनही हंगामात करता येते. मिरचीला 40 इंचापेक्षा कमी पाऊस असणे चांगले मिरचीच्‍या झाडांची आणि फळांची वाढ 25 ते 30 सेल्सिअस तापमानाला चांगली होते आणि उत्‍पादनही भरपूर येते. बियांची उगवण 18 ते 27 सेल्सिअस तापमानास चांगली होते.

जमीन -
पाण्‍याचा उत्‍तम निचरा होणारी ते मध्‍यम भारी जमिनीत मिरचीचे पिक चांगले येते. बागायती मिरचीसाठी मध्‍यम काळी आणि पाण्‍याचा उत्‍तम निचरा होणारी जमिन निवडावी.

हंगाम -
खरीप पिकाची लागवड जून, जूलै महिन्‍यात आणि उन्‍हाळी पिकाची लागवड जानेवारी फेब्रूवारी महिन्‍यात करावी.

सुधारित वाण -
पंत सी - १ - ही जात हिरव्‍या व लाल मिरचीच्‍या उत्‍पादनाला चांगली आहे. मिरची पिकल्‍यावर फळांचा आकर्षक लाल रंग येतो. या मिरचीचे साल जाड असते. फळांतील बियांचे प्रमाण अधिक असून बोकडया रोगास प्रतिकारक आहे.

संकेश्‍वरी 32 - या जातीची झाडे उंच असतात. मिरची 20 ते 25 सेमी लांब असून पातळ सालीची असतात. वाळलेल्‍या मरचीचा रंग गर्द लाल असतो.

पुसा ज्‍वाला - या जातीची झाडे बुटकी व भरपूर फांद्या असलेली असतात. या जातीची मिरची वजनदार व खुप तिखट असते.

जी - 2, जी - 3, जी - 4, जी - 5 या जातीची झाडे बुटकी असतात. या मिरचीच्‍या अधिक उत्पादन देणाऱ्या जाती आहेत.या शिवाय विद्यापीठांनी विकसीत केलेंडर अग्निरेखा, परभणी टॉल , फूले ज्‍योती, कोकणक्रांती, फूले मुक्‍ता फूले सुर्यमुखी, एनपी- 46 या सारख्‍या अधिक उत्‍पादन देणाऱ्या जाती लागवडीयोग्‍य आहेत.

पुसा सदाबहार - या जातीची झाडे उंच असतात. या जाती हिरव्‍या मिरचीचे सरासरी उत्‍पादन साडेसात ते दहा टन उत्‍पादन मिळते. ही जात मावा कोळी या किडींना तसेच डायबॅक आाणि विषाणूंजन्‍य रोगांना प्रतिकारक आहे.

लागवड -
जिरायती पिकासाठी सपाट वाफयावर रोपे तयार करतात. तर बागायती पिकासाठी गादी वाफयावर रोपे तयार केले जातात. वाफयावर दोन सेमी ओळीवर बियांची पातळ पेरणी करावी व बी मातीने झाकून टाकावे. बियाण्‍यांची उगवण होईपर्यंत वाफयांना दररोज पाणी द्यावे. बी पेरल्‍यानंतर 30 ते 40 दिवसांनी रोपे लागवडीस तयार होतात.

खते आणि पाणी व्‍यवस्‍थापन -
मिरचीच्‍या कोरडवाहू पिकासाठी दर हेक्‍टरी 50 किलो नत्र 50 किलो स्‍फूरद आणि ओलिताच्‍या पिकासाठी दर हेक्‍टरी 100 किलो नत्र 50 किलो स्‍फूरद आणि 50 किलो पालाश द्यावे. साधारणतः हिवाळयात 10 ते 15 दिवसांच्‍या अंतराने तर उन्‍हाळयात 6 ते 8 दिवसांच्‍या अंतराने पिकाला पाणी दयावे.

आंतरमशागत -
मिरचीच्‍या रोपांच्‍या लागवडीनंतर 20 ते 25 दिवसांनी पहिली खुरपणी करावी.

रोग
मर - हा रोग जमिनीतील बुरशीमुळे होतो. रोपाचा जमिनी लगतचा खोडाचा भाग आणि मुळे सडतात.
या रोगाच्या नियंत्रणासाठी 10 लिटर पाण्‍यात 30 ग्रॅम कॉपरऑक्‍झीक्‍लोराईड 50 टक्‍के मिसळून हेक्‍टरी रोपांच्‍या मुळांजवळ टाकावे.

फ्रूट रॉट अॅड डायबॅक - हा एक बुरशीजन्य रोग आहे. या रोगाचा प्रादुर्भाव झालेल्‍या हिरव्‍या किंवा लाल मिरचीवर वतुळाकार खोलगट डाग दिसतात. दमट हवेत रोगाचे जंतू वेगाने वाढतात आणि फळावर काळपट चटटे दिसतात आणि मिरची कुजून गळून पडते. या बुरशीमुळे झाडाच्‍या फांद्या शेंडयाकडून खाली वळत जातात. या रोगाच्या नियंत्रणासाठी डायथेन झेड-78 किवा डायथेन एम 45 किंवा कॉपर ऑक्सिक्‍लोराईड यापैकी कोणतेही एक बुरशीनाशक औषध 25 ते 30 ग्रॅम 10 लिटर पाण्‍यात मिसळून रोग दिसताच दर 10 दिवसांच्‍या अंतराने 3 ते 4 वेळा फवारावे.

भुरी - या रोगामुळे मिरचीच्‍या पानांवर आणि खालच्‍या बाजूला पांढरी भूकटी दिसते. या रोगाचा प्रादुर्भाव जास्‍त प्रमाणात झाल्‍यास झाडाची पाने गळतात. या रोगाचा प्रादुर्भाव दिसताच 30 ग्रॅम पाण्‍यात मिसळणारे गंधक किंवा 10 मिलीलिटर कॅराथेन 10 लिटर पाण्‍यात मिसळून मिरचीच्‍या पिकावर 15 दिवसांच्‍या अंतराने दोन फवारण्‍या कराव्‍यात.

किड
फूलकिडे - ही किड पाने आणि खोडातील रस शोषते त्‍यामुळे पानाच्‍या कडा वरच्‍या बाजूला चुरडलेल्‍या दिसतात. आणि खोड कमजोर बनते व पानांची गळ होते. या किडीच्या नियंत्रणासाठी रोपलावणीपासून 3 आठवडयांनी पिकावर 15 दिवसांच्‍या अंतराने 8 मिलीमिटर डायमेथेएम 10 लिटर पाण्‍यात मिसळून फवारावे.

मावा - हेक्‍टरी किटक मिरचीची कोवळी पाने आणि शेडयांतील रस शोषण करतात. त्‍यामुळे नविन पालवी येणे बंद होते. या किडीच्या नियंत्रणासाठी लागवडीनंतर 10 दिवसांनी 15 मिली मोनोक्रोटोफॉस 36 टक्‍के प्रवाही 10 लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी.

 

English Summary: Chilli Cultivation, Fertilizer and Disease Management
Published on: 28 November 2023, 04:42 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)