News

महाबीज बिजोत्पादकांना मिळणार भावफरकाची रक्कम.

Updated on 03 January, 2022 1:21 PM IST

चिखली- मागील वर्षी सोयाबीनला बाजार भाव जास्तीचे असतांना सोयाबीन बिजोत्पादक शेतकर्याना महाबीजने कमी भाव दिले होते.तर हिच बाब हेरुण तालुक्यातील शेतकर्यानी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक यांनी महाबीज बिजोत्पादक शेतकर्याना भावफरक रक्कम देण्यात यावी अशी मागणी कृषी मंत्री,कृषी सचिव,महाबीज व्यवस्थापकीय संचालक यांच्या हस्ते केली होती.परंतु याची दखल घेतली जात नसल्याने ३१डीसेंबर रोजी महाबीज भागधारकांची सर्वसाधारण सभेत तालुक्यातील बिजोत्पादक शेतकर्यानी मुद्दा उचलुन धरल्याने महाबीज प्रशासनाकडुन सोयाबीन बिजोत्पादकांना भावफरक रक्कम देण्याची घोषणा कृषी सचिव तथा महाबिजचे अध्यक्ष एकनाथ डवले व संचालक वल्लभराव देशमुख यांनी सभे दरम्याण केली आहे.तर या निर्णयामुळे हजारो महाबीज

बिजोत्पादकांना दिलासा मिळणार आहे.तर शेतकर्यासह स्वाभिमानी ने सुरु केलेल्या लढ्यास यश आले असेच म्हणावे लागेल.

मागील वर्षी चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला बाजार भाव ८ते १०हजार असतांना महाबिज कडुन मात्र बिजोत्पादकांची सोयाबीन ५२००रु ने खरेदी केली होती.तर नापास बियाणे मात्र बाजारात ९०००रु पर्यत दिल्या गेले तर या शेतकर्याना बाजार भाव व महाबिजने दिलेला कमी भाव यातील २०००ते २५००रू भावातील फरकाची रक्कम देण्यात यावी,अशी मागणी चिखली तालु्क्यातील बिजोत्पादक शेतकरी व स्वाभिमानी चे विनायक सरनाईक यांनी महाबिजकडे केली होती.

तर रविकांत तुपकरांनी काढलेल्या एल्गार मोर्चा व अन्नत्याग आंदोलना दरम्याण सुद्धा सदरची मागणी प्रामुख्याने करण्यात होती.याबाबत मंत्रालयातील उपमुख्यमंत्री अजीतदादा पवारांनी बोलवलेल्या बैठकीतही हा मुद्दा प्रमुख्याने गाजला होता.तर एकंदरीत रक्कमेचा आकडा निश्चित करुण निर्णय घेऊ असे अश्वासन तुपकरांना कृषीमंत्री यांच्याकडुन देण्यात आले होते.परंतु वेळोवेळी मागणी होवुन देखील दखल घेतली जात नसल्याने दि३१डीसेंबर रोजी अकोला येथे महाबीज भागधारकांची ४४वी सर्वसाधारण सभा दरवर्षी घेतली जात असते तर या सभेत फक्त महाबिजचे भागधारक शेतकरीच सहभागी होवुन प्रश्न उपस्थीत करु शकतात असे असल्याने स्वाभिमानी चे विनायक सरनाईक व बिजोत्पादक शेतकर्यानी पत्रकांची (पॉपलेटची)

शक्कल लढवत दि दि२७/०९/२०२१

रोजी केलेल्या सर्व मागण्यांची दखल घ्यावी व खरीप २०२०-२१मधील सर्व पास सोयाबीन महाबीज बिजोत्पादकांना किमान २०००ते२५००रु भाव फरक देण्यात यावा,महाबिज बिजोत्पादकांना भागधारकांसम बोलण्याची व मुद्दे मांडण्याची संधी देण्यात यावी,व यासह आदि मागण्यांची दखल घ्यावी अशी मागणी पत्रकाव्दारे करीत अकोला सभेचे ठिकाण गाठुन भावफरक प्रश्नी पत्रक(पॉपलेट)व निवेदनाच्या झेराॅक्स प्रती या महाबिजच्या सभेत वाटल्यामुळे भागधारकांकडुन बिजोत्पादकांना सुद्धा बोलण्याची संधी द्यावी अशी मागणी केल्याने या सभेमध्ये भागधारक व चिखली तालुक्यातील बिजोत्पादक यांनी भावफरक प्रश्नावर मुद्दे उपस्थीत करीत शेतकरी हिताच्या दृष्टिने विचार व्हावा

व महाबिज बिजोत्पादकांना भावफरक देण्यात यावा अशी मागणी भागधारक गणेश कंडारकर,तात्या कृपाळ व बिजोत्पादक शेतकरी नितिन शेळके व आदिंनी केली व महाबीज मध्ये उद्भवणार्या समस्यां देखील सोडवण्यात याव्यात अशी देखील मागणी केल्याने व सभेत भावफरक हाच मुद्दा गाजल्याने या मागण्यांची दखल घेत सभेच्या शेवटि प्रश्नांना उत्तरे देतांना महाबिजचे संचालक वल्लभराव देशमुख व कृषी सचिव तथा महाबिजचे अध्यक्ष एकनाथ डवले यांनी महाबिज व शेतकरी हिताच्या दृष्टिने मध्य मार्ग काढत ज्यांनी महाबीजला सोयाबीन दिली त्यांना भावफरक म्हणुन ४००रू आता तर २००नंतर अशी घोषणा केली तर या ३१डीसेंबर २०२१च्या वार्षीक आमसभेत इतर बियाण्यास बोनस म्हणुन २०१६-१७हरभरा

१३१रु प्रति क्वी, २०१८-१९सोयाबीन २००रु प्रति क्वी,२०१९-२०सोयाबीन५६०रु प्रति क्वी,सुधारीत ज्वारी १५७८रु प्रति क्वी,मुंग उडीद ३५०रु प्रति क्वी,तुर ५०६रु प्रति क्वी २०१९-२०हरभरा ९६०रु प्रति क्वी,तर मागील वर्षीच्या २०२०-२१च्या सोयाबीन साठी ४००+२००प्रति क्वी प्रमाणे बोनस (भावफरक) देण्याचे ठरले असल्याने चिखली तालुक्यातील शेतकर्यामुळे व स्वाभिमानी च्या प्रयत्नामुळे राज्यातील शेतकर्याना कोटि तर जिल्ह्यातील शेतकर्याना लाखो रुपये महाबिजकडुन मिळणार असल्याने महाबिज बिजोत्पादक शेतकर्याना दिलासा मिळणार आहे.

तर मोठे यश शेतकर्यासह स्वाभिमानी च्या प्रयत्नास आले आहे.यावेळी विनायक सरनाईक,विजय भुतेकर,नितिन शेळके,रजनिकांत पाटिल,पदमाकर भुतेकर,गणेश हाडे,विष्णु भुतेकर,राहुल पवार,ज्ञानेश्वर शेळके,शाम शेळके, गजानन भुतेकर,प्रकाश पवार,विशाल भुतेकर,शंकर खंडागळे,सुर्यकांत करवंदे,बालु खडके,धनंजय गाढवे,दिलीप करवंदे यांच्यासह तालुक्यातील सवणा येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थीत होते

 

प्रतिनिधी - गोपाल उगले

English Summary: Chikhali tashil farmer Swabhiman success
Published on: 03 January 2022, 01:21 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)