राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या दरे येथील मूळ गावी शेतीची पाहणी केली. त्यांनी चार महिन्यांपूर्वी लावलेल्या स्ट्रॉबेरीला आता फळे आली आहेत. याची चव देखील त्यांनी घेतली.
रोजच्या राजकारणातून ब्रेक घेत एकनाथ शिंदे हे त्यांच्या मूळ गावी शेतात रमले आहेत. शिंदे सध्या दोन दिवस मूळगावी दरे (ता. महाबळेश्वर) येथे गावच्या यात्रेसाठी आले आहेत. यावेळी त्यांनी शेताची पाहणी केली आहे.
गावाकडे येताच त्यांनी पहिल्यांदा शेतात जावून पिकांची पाहणी केली. मुख्यमंत्र्याची संपूर्ण सेंद्रीय शेती आहे. मुख्यमंत्री याच्या शेतात कोणतंच रासायनिक खत वापरलेले नाही. त्यांच्या शेतामध्ये लवंग, वेलची, दालचिनी, कॉफी, पेरू, आंबा, फणस, चिक्कू, सफरचंद, स्ट्रॉबेरी, मिरची, हळद बाहेरच्या राज्यात पिकणारे गवती चहा अशा विविध प्रकारच्या झाडांमधून त्यांनी आपली संपूर्ण शेती फुलवली आहे.
शेतकऱ्यांनो पिके संभाळा! राज्यात अनेक ठिकाणी पाऊस, तर काही ठिकाणी पावसाची शक्यता..
त्यांच्या शेतामध्ये असलेले गवती चहाचे पिक आगळं वेगळं आहे. या गवती चहाची उंची तब्बल 10 फुट आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. मुख्यमंत्री याच ठिकाणी मुक्कामास आहेत. नंतर ते मुंबईकडे रवाना होतील.
दरम्यान, मांढरदेवीच्या यात्रेत देखील ते सहभागी होणार आहेत. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांचा गावाकडे दुसरा दौरा आहे.
महत्वाच्या बातम्या:
जिल्हा बँकेकडून थकबाकीदार शेतकऱ्यांच्या जमिनीची लिलाव प्रक्रिया, 50 हजारापेक्षा जास्त भूमिहीन होणार, शेतकऱ्यांना धक्का..
शेतकऱ्याने महावितरणची जिरवली!डीपी नादुरुस्त झाल्याने न्याय आयोगाची शेतकऱ्यास 6 लाखाची भरपाई देण्याचे आदेश
हापूस आंब्याची पहिली पेटी पुण्याच्या बाजारपेठेत पोहोचली, किमतीने तोडले सगळे रेकॉर्ड
Published on: 07 January 2023, 03:27 IST