Kailas Patil : शेतकऱ्यांना 2020 चा पिक विमा ( (Pik Vima)) मिळावा आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे राज्य शासनाकडील थकीत 1208 कोटी रुपयांचे अनुदान मिळावे या मागणीसाठी ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील (Mla Kailas Patil) गेल्या सहा दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी रात्री कैलास पाटील यांच्याशी संवाद साधला आहे. याबाबत विमा कंपनीशी बैठक घेऊ, तसेच सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीचे पैसे लवकरात लवकर देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती कैलास पाटील यांनी दिली. मात्र, जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, त्यांना पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचं कैलास पाटील यांनी सांगितले आहे.
हेही वाचा: साखरेवरील निर्यातबंदी वाढवली; केंद्र सरकारने 'या' कारणांसाठी घेतला निर्णय
सहा दिवसापासून ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी बेमुदत आमरण उपोषण आंदोलन पुकारले आहे. याच आंदोलनाच्या समर्थनात आज (दि.29) खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उस्मानाबाद जिल्हा बंदची आव्हान केले आहे. खासदारांच्या या आव्हानाला उस्मानाबाद जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळला.
माझ्या उपोषणामुळे शेतकऱ्यांना लवकर पैसे मिळणार असतील तर मी हे उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. शेतकऱ्यांचे पैसे मिळाल्यावरच मी उपोषण सोडेन, असेही पाटील म्हणाले. काल एकाच दिवसात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचेही पाटील म्हणाले.
हेही वाचा: आनंदाची बातमी: किसान समृद्धी केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळणार
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे. त्यांचा विश्वास बसत नाही, असे नाही, तर प्रशासकीय कारवाईला दिरंगाई होत आहे. कारण जिल्हाधिकाऱ्यांनी 13 ऑक्टोबरला पाठवलेला प्रस्ताव काल विभागीय आयुक्तांनी पाठवला आहे. या प्रकारामुळे कामात दिरंगाई होत आहे. शेतकऱ्यांना एक-दोन दिवस लवकर पैसे मिळाले तर उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे कैलास पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा: सोयाबीनच्या दरात चढ की उतार? पहा आज किती मिळाला दर ?
हेही वाचा: सर्वात मोठी बातमी! पोलिस भरतीला स्थगिती
Published on: 30 October 2022, 11:00 IST