News

तौक्ते चक्रीवादळामुळे कोकणात प्रचंड नुकसान झाले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून परिस्थितीची पाहणी केली जाणार आहे. तौक्ते चक्रीवादळात कोकणातील घरे, झाडे, फळबागा तसेच इतर गोष्टींचे नुकसान झाले आहे. रत्नागिरीत कृषी क्षेत्राचे अंदाजित २५०० हे. आर. क्षेत्राचे नुकसान झाले असून अद्याप पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू आहे.

Updated on 22 May, 2021 10:57 AM IST

तौक्ते चक्रीवादळामुळे कोकणात प्रचंड नुकसान झाले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून परिस्थितीची पाहणी केली जाणार आहे. तौक्ते चक्रीवादळात कोकणातील घरे, झाडे, फळबागा तसेच इतर गोष्टींचे नुकसान झाले आहे.

रत्नागिरीत कृषी क्षेत्राचे अंदाजित २५०० हे. आर. क्षेत्राचे नुकसान झाले असून अद्याप पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू आहे. तसेच २० बोटींचे अंशत: नुकसान झाले असून पंचनामे सुरू आहेत. राज्याचे विधासभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसदेखील सध्या कोकण दौऱ्यावर असून नुकसानाची पाहणी करत आहेत. फडणवीस दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री कधी घऱाबाहेर पडणार अशी टीका विरोधकांकडून केली जात आहे.

 

गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तौते चक्रीवादळग्रस्त रत्नागिरी आणि सिंधुदुर्गस भेट देणार असल्याचे जाहीर करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नुकसानग्रस्त भागांची पाहणी करणार असून प्रशासनाकडून आढावाही घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फक्त गुजरातची पाहणी करुन मदत जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून टीका होत असताना कोकणासाठी मुख्यमंत्री किती मदत जाहीर करतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

कसा आहे मुख्यमंत्र्यांचा दौरा

सकाळी ८.३५ वाजता – रत्नागिरी विमानतळ येथे आगमन
८.४० वा. “तौक्ते” चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत जिल्हा प्रशासनासमवेत आढावा बैठक
सकाळी ९.४० वाजता हेलिकॉप्टरने चिपी विमानतळ, सिंधुदुर्ग येथे आगमन व मोटारीने वायरी ता. मालवणकडे प्रयाण
सकाळी १०.१० – वायरी, ता.मालवण येथे “तौते” चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी
सकाळी १०.२५ – मोटारीने मालवण येथे आगमन व “तौते” चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी
सकाळी ११.०५ – निवती, ता. वेंगुर्ला येथे “तौक्ते” चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी
या पाहणीनंतर सकाळी ११.३० वाजता चिपी विमानतळ बैठक सभागृह येथे मोटारीने आगमन व नुकसानीबाबत जिल्हा प्रशासनासमवेत 

आढावा बैठक
चिपी विमानतळ येथून हेलिकॉप्टरने रत्नागिरीकडे प्रयाण
दुपारी १२.३५ वाजता रत्नागिरी विमानतळ येथे आगमन व विमानाने मुंबईकडे प्रयाण

English Summary: Chief Minister Uddhav Thackeray arrives in Konkan; Taukte will review the damage caused by the cyclone
Published on: 21 May 2021, 10:06 IST