मुंबई
राज्यात सुरु असलेल्या पावसामुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी (दि.२७) रोजी आढावा घेतला आहे. राज्यात सुरु असलेल्या पावसाचा, पेरणी आढावा घेत असताना राज्यातील पावसाची माहिती देखील त्यांनी घेतली आहे.
यवतमाळ, जळगाव, बीड, नांदेड, बुलढाणा येथे अधिक पेरणी झाली असून सांगली, ठाणे, पुणे, सोलापूर, गडचिरोली येथे कमी पेरणी झाली आहे.सर्वाधिक पेरणी सोयाबीनची १११ टक्के आणि कापसाची ९६ टक्के झाली आहे.
दरम्यान, जास्तीच्या पावसामुळे पेरणी वाया गेली किंवा दुबार पेरणीची शेतकऱ्यांवर वेळ आल्यास महाबीज त्यासाठी संपूर्ण नियोजन केले आहे, अशी माहिती कृषी विभागाने यावेळी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिली आहेत.
Published on: 28 July 2023, 10:22 IST