News

मुंबई : राज्यसभेच्या (Rajya Sabha) 6 जागांसाठी राज्यातून 7 उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. आता राज्यात राज्यसभेच्या निवडणुकीला वेग आला आहे. राजकीय पक्षामध्ये राज्यसभेवर उमेदवार पाठण्यासाठी रस्सीखेच सुरु आहे. सहाव्या जागेसाठी मतांची जुळवाजुळव सुरु आहे.

Updated on 06 June, 2022 3:41 PM IST

मुंबई: राज्यसभेच्या 6 जागांसाठी राज्यातून 7 उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. आता राज्यात राज्यसभेच्या निवडणुकीला वेग आला आहे. राजकीय पक्षामध्ये राज्यसभेवर उमेदवार पाठण्यासाठी रस्सीखेच सुरु आहे. सहाव्या जागेसाठी मतांची जुळवाजुळव सुरु आहे.

राज्यसभेसाठी भाजपने तीन उमेदवार, शिवसेनेने दोन उमेदवार, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने प्रत्येकी एक एक उमेदवार दिला आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी सेना आणि भाजपमध्ये चांगलीच चुरस रंगली आहे. प्रत्येक पक्ष अपक्ष आमदारांना आपल्या बाजुने मत वळवण्यासाठी अपक्ष आमदारांची आणि छोट्या घटक पक्षाची मनधरणी करत आहे.

Panjabrao Dakh: पंजाबरावांचा 2022 चा मान्सून अंदाज जाहीर; काय म्हणतायेत डख वाचा...

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांना दिला थेट इशारा

बच्चू कडू हे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या धान आणि हरभऱ्याच्या अनुदानाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहेत. राज्यात धान आणि हरभऱ्याच्या अनुदानाची व्यवस्था नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी तातडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलून धान खरेदी सुरू करावी, अन्यथा आम्ही राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाबाबतचा निर्णय शेवटच्या ५ मिनिटांमध्ये घेऊ, अशा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.

राज्य सरकारचा मोठा निर्णय; 'या' योजनेंतर्गत मिळणार 50 हजार रुपये, जाणून घ्या सविस्तर...

केंद्र आणि राज्य सरकारने या धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी तातडीने पावले उचलावी अशी कडूची मागणी आहे. पण ही जर मागणी दुर्लक्षित केली तर राज्यसभेचे मतदान हे शेवटच्या पाच मिनिटात करू असा इशारा सुद्धा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.

बच्चू कडू यांच्या या भूमिकेनंतर आता महाविकास आघाडी काय पाऊल उचलणार, हे पाहावे लागेल. राज्यमंत्री बच्चू कडू व त्यांच्या प्रहार पक्षाचे आमदार राजकुमार पटेल ही दोन मते त्यांच्याकडे आहेत.

चिंता वाढली : कोरोना डोकं वर काढतोय, 24 तासांत 4270 नवे रुग्ण; 15 जणांचा मृत्यू

English Summary: Chief Minister Prime Minister Rajya Sabha elections
Published on: 06 June 2022, 03:41 IST