News

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी बिहार सरकारला घेरले आहे. ते म्हणाले, बिहारमध्ये सत्तापरिवर्तन झाले तेव्हा मी अमेरिकेत होतो. तिथे मला एका ओळखीच्या व्यक्तीने सांगितले की, आपल्या परदेशात जसे मुली बॉयफ्रेंड बदलतात, तसे बिहारचे राजकारण आहे.

Updated on 19 August, 2022 12:45 PM IST

नुकतेच बिहारमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. बिहारमध्ये जदयूने भाजपची साथ सोडून आरजेडीप्रणित महागंठबंधनाशी घरोबा केला आहे. त्यामुळे भाजपला धक्का बसला आहे. या धक्क्यातून भाजप नेते अजूनही सावरले नसल्याचे दिसत आहे. आता भाजप नेत्याने एक वक्तव्य केले आहे. यामुळे सध्या याची चर्चा सुरु आहे.

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी बिहार सरकारला घेरले आहे. ते म्हणाले, बिहारमध्ये सत्तापरिवर्तन झाले तेव्हा मी अमेरिकेत होतो. तिथे मला एका ओळखीच्या व्यक्तीने सांगितले की, आपल्या परदेशात जसे मुली बॉयफ्रेंड बदलतात, तसे बिहारचे राजकारण आहे. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ पुन्हा सत्तेत येण्याच्या दाव्याबाबत कैलाश विजयवर्गीय म्हणाले की, कमलनाथ जी यांचे वय ७५ च्या वर आहे, त्यांच्या मुद्द्याकडे गांभीर्याने पाहिले जाऊ नये.

ते म्हणाले की, स्वातंत्र्याच्या अमृताबद्दल परदेशात प्रचंड उत्साह आहे, भारतीयांमध्येही उत्साह आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व सर्वजण स्वीकारतात. संसदीय मंडळात शिवराज यांना हटवल्याप्रकरणी ते म्हणाले की, राजकारणाला गती नको, पक्षात बदल होतच राहतात. सत्यनारायण जातियाला घेण्याबाबत ते म्हणाले की, ते माझे जुने मित्र आहेत, 1983 मध्ये मी नगरसेवकपदाची निवडणूक लढवली, तेव्हा ते उज्जैनचे खासदार होते. नवीन लोकांनाही संधी मिळायला हवी.

कोरोना वाढतोय! प्रवाशांना पुन्हा मास्क सक्ती, वाचा आता नवीन नियम..

पश्चिम बंगालचा पदभार परत घेण्याबाबत ते म्हणाले की, मध्य प्रदेशात ही गोष्ट कुठून आली हे मला माहीत नाही. मी पश्चिम बंगालचा प्रभारी होतो आणि अजूनही आहे. पश्चिम बंगालच्या प्रभारीपदावरून माझी अद्याप सुटका झालेली नाही, असेही ते म्हणाले. तसेच समाजवादी पक्षाचे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी भाजपवर निशाणा साधला.

विनायक मेटेंच्या भाच्याच्या दाव्याने खळबळ! म्हणाले, तेव्हा विनायक मेटे कारमध्ये नव्हतेच...

स्त्रीयांबाबत असा नकारात्मक विचार करणारे भाजपवाले असताना भाजपच्या कार्यकाळात देशातील महिलांची स्थिती कशी सुधारेल? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या जदयूने भाजपची साथ सोडून राजदप्रणित महागठबंधनाचे सरकार स्थापन केले. नितीश कुमार यांनी नवव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तर राजदच्या तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

महत्वाच्या बातम्या;
तरुणांनो मोठ्या प्रमाणावर दारू प्या!! सरकारनेच केले आवाहन, वाचा काय आहे कारण...
शेतकऱ्याला मिळाले एकरी 2 कोटी 80 लाख, रोडच्या भूसंपादनासाठी मोठी रक्कम अदा..
'शेतकऱ्यांना 50 हजार अनुदान न देणारे भिकारी सरकार'
'गद्दारांना भाजपची ताट वाटी, चलो गुवाहाटी,चलो गुवाहाटी'

English Summary: Chief Minister Nitish Kumar has chosen a new partner just as girls change 'boyfriends'.
Published on: 19 August 2022, 12:45 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)