शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात आहे. मात्र ही मागणी अजूनही पूर्ण झाली नाही. सध्या रब्बी हंगामातील पिकांना पाणी दिले जात असताना शेतकऱ्यांना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागत आहे.
शेतकऱ्यांना रात्रभर जागून पाणी द्यावे लागत आहे. तसेच वन्यप्राण्यांचा त्रास देखील सहन करावा लागत आहे. हल्ल्यात अनेक शेतकऱ्यांनी आपला जीव देखील गमावला आहे. असे असताना आता सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे.
यामध्ये मुख्यमंत्रीसाहेब शेतीला किमान दिवसा लाईट द्या ओ! असा मेसेज सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोचवला जात आहे. याद्वारे मुख्यमंत्र्यांना भावनिक साद घातली जात आहे. यामुळे मुख्यमंत्री काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारने जाहीर केली मदत! अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा..
शेतीसाठी वीजपुरवठा करण्याचे वेळापत्रक सध्या जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये शेतीसाठी रात्रीची वीज देण्यात आली आहे. यामध्ये रात्री दहा बारानंतर वीज पुरवठा जाहीर करण्यात आले आहे. यामुळे जीव धोक्यात घालून शेतकऱ्यांना पाणी द्यावे लागत आहे.
छत्रपतीच्या निवडणुकीसाठी विरोधकांनी शड्डू ठोकला! जाचक-घोलप-काकडे एकाच व्यासपीठावर
तसेच डीपी मध्ये काही बिघाड आल्यास वायरमन देखील रात्रीच्या वेळी उपलब्ध होत नसल्याने शेतकरी जीव धोक्यात घालून डीपीकडे जातात. यामुळे सरकारने याकडे लक्ष घालण्याची गरज आहे. यामुळे याबाबत मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी होत आहे.
महत्वाच्या बातम्या;
लाल मिरचीच्या दरात विक्रमी वाढ, मिळतोय आतापर्यंतचा सर्वाधिक दर
'शेती फायद्यात आणण्यासाठी केंद्र सरकार कृषी स्टार्टअप्सना मदत करत आहे'
"मुलगा पेपर लिहिणार आणि बाप तपासणार, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटवरुन शेट्टींचा पवारांना टोला"
Published on: 03 November 2022, 01:24 IST