गाव आणि व्यक्ती यांचे एक अतूट नाते असते. बऱ्याचदा आपण बोलताना ऐकतो की, गाव हे गाव असते. शेवटी व्यक्ती कितीही मोठी झाली. मग ती सामाजिक दृष्ट्या असो किंवा राजकीयदृष्ट्या परंतु आपल्या गावाची आणि मातीशी असलेली नाळ कधी सोडता येत नाही.
गाव म्हटले म्हणजे एक अद्भुत आणि मानसिक शांती देणारे ठिकाण असते. दैनंदिन आयुष्यातील धावपळीतून निवांत आणि मनाला शांती देणारे ठिकाण म्हणजेच आपले जन्मगाव असते.
अशीच काहीशी गोष्ट, महाराष्ट्राचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाबत सांगता येईल. एकनाथ शिंदे यांच्या बद्दल बोलायचे झाले तर एकंदरीत राज्याच्या राजकारणात चांगला ठसा असणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते.
कालच त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांची राजकीय बाजू सगळ्यांना माहिती आहे. परंतु त्यांची एक गावाशी नाते सांगणारी जी काही बाजू आहे ती बऱ्याच जणांना अजून माहिती नसेल.
परंतु एकनाथ शिंदे यांच्या बद्दल बोलायचे झाले तर कितीही व्यस्त वेळ असला तरी ते वेळात वेळ काढून गावी जाऊन त्यांना असणारी शेतीची आवड ते जपतात. एकनाथ शिंदे यांचे मूळ गाव दर्रे तर्फ तांब असून ते सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील आहे.
त्यांच्या या गावी त्यांची शेती असून त्याठिकाणी ते भात आणि स्ट्रॉबेरीच्या कामांमध्ये बर्याचदा हातभार लावत असतात.
राजकारण आणि समाजकारण या व्यस्त जीवनातून ते वेळात वेळ काढून गावी जाऊन आपली शेतीची आवड जपतात. त्यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील दरे असून त्या ठिकाणी त्यांचे घर आणि शेती आहे.
त्यांच्या शेतीमध्ये ते भात आणि स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतात. विशेष म्हणजे दरवर्षी पावसाळा सुरू होतो, तेव्हा त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे आणि कुटुंबासह गावात येतात व स्वतः चिखलात भात लावणी करतात.
नुकतेच त्यांचे काही शेतात काम करतानाचे फोटो व्हायरल होत आहेत. त्यांच्या व्यस्त कार्यक्रमांमधून जसा वेळ मिळेल तसे ते वारंवार गावी येतात व गावी आल्यानंतर आपल्या शेतीकडे विशेष लक्ष पुरवितात. गावी आल्यानंतर ते शेतीकडे विशेष लक्ष केंद्रित करतात व शेतीची कामेही आवर्जून करतात.
यामध्ये ते गवत काढणे, बांधलेल्या पेंड्या बांधावर ठेवणे आणि ते लावण्यातही दंग झालेले पाहायला मिळतात. शिंदे यांचे मूळ गाव असलेल्या दरे या ठिकाणी त्यांनी शेतात कुटुंबीयांसोबत स्ट्रॉबेरीची लागवड केली होती.
या कामांमध्ये त्यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी देखील स्ट्रॉबेरी लागवडीच्या कामात त्यांना मदत केली होती.
Published on: 01 July 2022, 10:12 IST