News

जालना घटनेवरून राज्यात मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलनाला हिंसक वळण लागले आणि ते सोलापूर, औरंगाबाद, नागपूर आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये पसरले. अनेक ठिकाणी बंद ठेवून निषेध करण्यात आला आहे.

Updated on 04 September, 2023 11:40 AM IST

जालना घटनेवरून राज्यात मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलनाला हिंसक वळण लागले आणि ते सोलापूर, औरंगाबाद, नागपूर आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये पसरले. अनेक ठिकाणी बंद ठेवून निषेध करण्यात आला आहे.

असे असताना आज मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत एक नियोजन जारी केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी बैठक होणार आहे.

या बैठकीला मराठा आरक्षण मंत्री, उपसमितीतील सर्व सदस्य मंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन्ही नेते उपस्थित राहणार आहेत. यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तसेच या बैठकीत मराठवाडा विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजी नगर, हिंगोली, परभणी, अहमदनगर, जालना, नांदेड, लातूर, या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक असे सर्व वरिष्ठ प्रशासकिय अधिकारी देखील सहभागी होणार आहेत.

मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरंगे पाटील यांना देखील सरकारने या बैठकीसाठी निमंत्रण दिले असल्याची माहिती समोर आली आहे. आता या बैठकीमध्ये मराठा आरक्षणाबाबत नेमका काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जरंगे हे मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी ते उपोषणाला बसले होते. अधिकाऱ्यांनी त्याना रुग्णालयात हलवण्याचा प्रयत्न केल्यानंतर शुक्रवारी आंदोलनाला हिंसक वळण लागले. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केल्याचा प्रकार घडल्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत.

असाच बरसत रहा!! पुणे जिल्ह्यासह राज्यातील काही भागात पाऊसाची दमदार एन्ट्री...

English Summary: Chief Minister Eknath Shinde will take a big decision.? Important meeting regarding reservation today, attention of Maratha community...
Published on: 04 September 2023, 11:32 IST