News

आज राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आमच्या नेत्या संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे

Updated on 09 November, 2022 8:10 AM IST

आज राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आमच्या नेत्या संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांचे विषयी गलीच्छ आणि खालच्या भाषेत वक्तव्य केल आहे त्याचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो.राज्याचे कृषिमंत्री हे मागील अनेक दिवसांपासून

वेगवेगळ्या प्रकारचे वक्तव्य करून बदनाम करण्याचा प्रयत्न सातत्याने करत आहेत.They are constantly trying to discredit by making different kinds of statements.

बॅंकांनी शेतकऱ्यांच्या खात्यावरील होल्ड काढावा, अन्यथा आंदोलन - गोपाल तायडे

मी खऱ्या अर्थाने आज त्यांचा निषेध करत असताना सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी अशा मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढला

पाहिजे अशी विनंती या ठिकाणी करतो.सुप्रियाताई सुळे मागील अनेक वर्षांपासून खासदार आहेत संसदेमध्ये उल्लेखनीय असं काम त्यांनी करून दाखवला आहे. जनतेच्या, समाजाच्या विविध समस्येवर त्या सतत आपलं मत संसदेमध्ये न

डगमगता मांडत असतात. हे सगळं करत असताना एक स्त्री म्हणून त्यांच्याकडे पाहत असताना या शासनाचा आणि या मंत्र्यांचा दृष्टिकोन कसा आहे हे सत्तरांच्या वक्तव्यातून दिसून येते.

 

- डॉ.राजेंद्र शिंगणे

माजी मंत्री, आमदार, सिंदखेडराजा

English Summary: Chief Minister Abdul Sattar should resign immediately - Dr. Rajendra Shingane
Published on: 08 November 2022, 07:20 IST