News

इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना हा लवकरच गतवैभव प्राप्त करणार आहे. नवीन प्रकल्पाचा शेवटचा हप्ता राहिलेला आहे तो गेल्यानंतर कर्ज राहणार नाही, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी दिली.

Updated on 09 March, 2023 1:03 PM IST

इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना हा लवकरच गतवैभव प्राप्त करणार आहे. नवीन प्रकल्पाचा शेवटचा हप्ता राहिलेला आहे तो गेल्यानंतर कर्ज राहणार नाही, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी दिली.

काटे म्हणाले, 2019-20 च्या गाळप हंगामात कारखान्याच्या अध्यक्षपदाची सूत्रे माझ्याकडे आल्यानंतर प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली होती. गाळप हंगाम अतिशय खडतर असताना कारखान्याच्या तिजोरीत खडखडाट असताना ऊसतोडणी, वाहतुकीसाठी सुखदेव सानप, भाऊसाहेब आंधळे यांच्या सर्व सहकार्‍यांनी बिगर अ‍ॅडव्हान्स यंत्रणा उपलब्ध करून दिली.

या हंगामात 4 लाख 17 हजार टन उसाचे गाळप केले. गाळप हंगाम सुरू करताना कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेऊन त्याचे व्याज किती होते, या सगळ्या गोष्टींचा हिशोब करूनच संचालक मंडळाने अ‍ॅडव्हान्समध्ये साखर व मळी विकण्याचा निर्णय घेण्याचा धाडस केले.

शेतकऱ्यांनो उन्हाळ्यातील फळबागांचे व्यवस्थापन

सध्या सभासदांना इतर कारखान्यांपेक्षा दोन रुपये कमी मिळत आहेत त्यात सभासदांची नाराजी आहे. परंतु कारखान्याला लवकरच पूर्वीचे वैभव प्राप्त होणार आहे, असेही काटे म्हणाले.

संचालक मंडळ, सभासद, कामगार यांनी एकोप्याने केलेल्या कामामुळे छत्रपती कारखान्याचे रोपटे पुन्हा एकदा चांगलं बहरत असून, याचा लवकरच वटवृक्ष झाल्याशिवाय राहणार नाही. 

तू हुबेहूब सनी देओलसारखा दिसतोस, शेतकऱ्याने विचारताच सनी देओल म्हणाला मीच आहे..

तसेच येणार्‍या गाळप हंगामात साखरउतारा देणार्‍या उसाच्या जातींच्या गाळप होणार आहे. तसेच पुढील ऊसलागवड नियोजन करताना कडक धोरण करून साखर उतार्‍याच्या उसाच्या जाती वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे देखील ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या;
कुमकुम भेंडीला ५०० रुपये किलोचा भाव, शेतकऱ्यांना आहे फायदेशीर..
याच्यापेक्षा वाईट दिवस काय असतील? शेतकऱ्यांच्या वांग्याला प्रति किलो 27 पैसे दर...
ईकोदीप निर्मिती उद्योग हा महिला सक्षमीकरणाचा महामार्ग- डॉ.लक्ष्मण प्रजापत

English Summary: Chhatrapati Factory will soon regain its past glory, the final installment of the new project loan remains...
Published on: 09 March 2023, 01:03 IST