सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या उन्हाळी कांद्याला पिंपळगाव बाजार समितीत 4200 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. या वर्षीच्या हंगामात बाजार समितीत कांद्याला मिळालेला हा सर्वात उच्चांकी दर आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, निफाड तालुक्यातील सुकेने येथील कांदा उत्पादक शेतकरी शामराव सिताराम मोगल यांनी यांच्या शेतात लावलेल्या कांद्यासाठी कुठल्याही प्रकारचे केमिकल्स, फवारणीसाठी कुठल्याही प्रकारचे रासायनिक कीटकनाशके यांचा वापर न करता सेंद्रिय खतांचा वापर करून कांद्याचे उत्पादन घेतले. शामराव सिताराम मोगल यांनी पिकवलेल्या कांद्याला त्यांनी थेट बैलगाडीत सजावट करून वाजत गाजत कांदा मार्केट मध्ये विक्रीस आणला होता. मोगल यांनी सेंद्रिय पद्धतीने कांदा पिकविला बद्दल बाजार समितीचे सभापती दिलीप बनकर व मान्यवरांच्या उपस्थितीत शामराव मोगल यांचा सत्कार करण्यात आला.
तिकडे मागणीच्या तुलनेत कांद्याचा पुरवठा देशांतर्गत बाजारात मोठ्या प्रमाणात सुरुवात झाल्याने कांद्याच्या बाजारभावात कमालीची घसरण होत आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाकिस्तानचा कांदा स्वस्त दरात उपलब्ध होत असताना दुसरीकडे पिंपळगाव बसवंत बाजार समितीत सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या उन्हाळी कांद्याला 4200 रुपये प्रतिक्विंटल इतका उच्चांकी दर मिळाला.
कांद्याच्या भावात घसरण
एपीएमसी कांदा मार्केट मध्ये कांद्याच्या दरात पाच रुपयांनी घसरण झाली. तसेच आंतरराष्ट्रीय मार्केटचा विचार केला तर पाकिस्तानचा कांदा भारतीय कांद्याच्या तुलनेत स्वस्त मिळत असल्याने भारतीय कांद्याच्या भावात घसरण पाहायला मिळत आहे तसेच बांगलादेश ने सीमा बंद केल्याने आपल्या कडून बांगलादेशात जाणारा कांदा कमी झाला आहे.
परिणामी कांद्याचे व्यापारावर परिणाम झाला असून मालाला अधिक उठाव नसल्याने कमी दरात विक्री करावी लागत असल्याचे व्यापारी सांगत आहेत.
या क्षेत्रातील तज्ञांचे म्हणणे आहे की देशांतर्गत मागणीच्या तुलनेत कांद्याचा पुरवठा कमी होत असल्याने बाजारभाव टिकून राहण्यास मदत झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून न जाता आपला कांदा टप्प्याटप्प्याने गरजेनुसार बाजार समितीमध्ये विक्री करावा. पाकिस्तानच्या कांद्यामुळे भारतीय कांद्याच्या बाजारभावात सध्यातरी कोणताही परिणाम होणार नसल्याने शेतकऱ्यांनी कांदा विक्रीची घाई करू नये.
Published on: 03 July 2021, 09:12 IST