News

सध्या खर्च टंचाईचा सामना शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात करावा लागत आहे. आधीच खरीप हंगाम पूर्ण हातातून गेल्यानंतर मोठ्या उमेदीने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची तयारी पूर्ण करून पेरण्या पूर्ण केल्या.

Updated on 10 February, 2022 12:38 PM IST

सध्या खर्च टंचाईचा सामना शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात करावा लागत आहे. आधीच खरीप हंगाम पूर्ण हातातून  गेल्यानंतर मोठ्या उमेदीने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची तयारी पूर्ण करून पेरण्या पूर्ण केल्या.

आता रब्बी हंगामातील मका, कांदा, हरभरा इत्यादी पिकांना खतांची आवश्यकता असल्याने आणि नेमकी त्याच पार्श्वभूमीवर खतांची टंचाई जाणवत असल्याने शेतकऱ्यांना खतांसाठी वाट पाहावी लागत आहे. पिकांसाठी आता 10:26:26,24:24:0,12:32:16 तसेच  एम ओ पी या संयुक्त खताची गरज असल्याने यांची मागणी वाढली आहे. परंतु खतांचा पुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांना खत मिळवण्यासाठी रांगा लावाव्या  लागत आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एकंदर संतापाचे वातावरण आहे.

खत टंचाई मागील काही आंतरराष्ट्रीय कारणे

रासायनिक खतांच्या निर्मितीसाठी आवश्यक असणारे पोट्याश  फास्फोरिक ते 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्तहे बेलारुस या देशातून आयात करावे लागते. परंतु बेलारूस मध्ये सध्या युद्धजन्य परिस्थिती असल्याने तयार करण्यासाठी लागणारा कच्चामाल  येण्यास मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. 

भारताने कच्च्या मालावर तीन ते चार टक्के आयात शुल्क वाढवले आहे. त्यामुळे 180 डॉलर प्रति मेट्रिक टन विक्री होणारे पोटॅश $450 वर पोहोचली आहे. फॉस्फरिक ऍसिड प्रति मेट्रिक लिटर 380 डॉलर हुन 1380 डॉलर एवढे झाले आहे. त्यामुळे कंपन्यांनी उत्पादनात घट केली आहे.(स्त्रोत-दिव्यमराठी)

English Summary: chemical fertilizer shortage in nashik district farmer so anxiaty
Published on: 10 February 2022, 12:38 IST