खरीप हंगामानंतर आता रब्बी हंगामाच्या बऱ्याच पेरणी आता पूर्ण होत आले आहेत. परंतु रब्बी हंगामाच्या सुरुवातीलाच जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खतांच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे.खतांच्या मागणी मध्ये प्रामुख्याने डीएपी,युरिया, सुपर फास्फेट तसेच 10:26:26 सारख्या खतांची टंचाई भासत आहे.
मागणीच्या मानाने या खतांचा अत्यल्प पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना खतांसाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. खानदेश मध्ये रब्बी हंगामाची 180 टक्के पेरणी अपेक्षित असताना खतांची आवश्यकता देखील त्या प्रमाणात आहे परंतु खतेच उपलब्ध होत नाहीत. शेतकरी गव्हाची, ज्वारी, मका इत्यादी पिकांची पेरणी करतानाच खतांचा वापर करतात. परंतु सरळ खतांमध्ये दानेदार सुपर फॉस्फेट व युरियाची टंचाई आहे तसेच डीएपी, 10:26:26 एक खतांची टंचाई भासत आहे.
खानदेश मध्ये जवळजवळ चार लाख टन खतांची आवश्यकता आहे. परंतु कृषी विभागामार्फत फक्त पावणेदोन लाख टन खताचा पुरवठा निश्चित करण्यात आला असून पेरणी वाढत असल्याचे लक्षात घेऊन खतांची मागणी करणे अपेक्षित होते परंतु पारंपारिक पद्धतीने किंवा पूर्वीप्रमाणे खतांची मागणी कमी करण्यात आले. जळगाव जिल्ह्यात सुमारे सव्वा लाख टन विविध खतांचा पुरवठा होणार असून धुळे व नंदूरबार मिळून सुमारे 60 हजार टन खतांचा पुरवठा होणार आहे.
यामध्ये खानदेशात मिळून सुमारे एक लाख टन युरियाचा पुरवठा होईल. मिश्रखतांचा विचार केला तर यामध्ये 10:26:26 खताची मागणी जास्त आहे पण त्याचा पुरवठा हा महिन्यापासून व्यवस्थित होतं असून जळगाव जिल्ह्यात फक्त दोन वेळेस या खताचे रॅक प्राप्त झाले आहेत. यामध्ये सुमारे दोन हजार टन 10:26:26खत प्राप्त झाली आहे. यासोबत पोटॅश ची मागणी देखील वाढली असून चोपडा, यावल या भागात शेतकर्यांना हवा तेवढ्या उपलब्ध होत नसल्याची स्थिती आहे.
Published on: 24 December 2021, 07:03 IST