जे लोकं चेकचा वापर करून आर्थिक व्यवहार करतात त्यांच्यासाठी एक मोठी बातमी आहे. रिझर्व बँक ऑफ इंडिया याबद्दल एक मोठा निर्णय घेतला असून येत्या सप्टेंबरपासून सर्व बँकांच्या शाखेमध्ये सीटीएस पद्धत सुरू होणार आहे.
सध्या देशातील काही शहरांमध्ये सीटीएस पद्धत चेक व टवण्यासाठी वापरले जाते. केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर वित्तीय धोरण सादर करतांना आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी ही घोषणा केली.
काय आहे सीटीएस प्रणाली?
भारतामध्ये रिझर्व बँक ऑफ इंडियाने सन 2010 मध्ये सीटीएस. सुविधा सुरू केली होती. सप्टेंबर 2021 पासून त्यातील सर्व बँकांमध्ये ही सुविधा सुरू होईल. केंद्रीय बँकांनी चेक व्यवहार सुरक्षित होण्यासाठी पॉझिटिव्ह पे सिस्टम सुरू केली आहे. प्रणाली 1 जानेवारी 2021 पासून सुरू करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत 50,000 व त्यापेक्षा अधिक रकमेचा चेक ठेवला जाणार आहे. चेकने व्यवहार करताना तो ज्या बँकेचा दिलेला असतो. त्या बँकेत क्लिअरिंगसाठी घेऊन जावे लागत असे. परंतु सीटीएस पद्धत सुरू झाल्यानंतर चेक पटविणे सोपे झाले आहे.
या प्रणाली पुढे चेक क्लिअरिंग सोपे आणि जलद होते सीटीएस पद्धतीत चेक दुसऱ्या बँकेत घेऊन जावे लागत नाही. चेकऐवजी त्याच्याच इलेक्ट्रॉनिक प्रतिमा दुसऱ्या बँकेत पाठवले जाते. त्याच्याकडून मजुरी आल्यानंतर ग्राहकांच्या खात्यावर पैसे वर्ग केले जातात. यामध्ये चेक फाटने किंवा खराब होईल अशा प्रकारच्या अडचणी निर्माण होत नाही.
Published on: 10 February 2021, 07:51 IST