सोप्या पद्धतीने पाहा आधार रीप्रिंटचे स्टेटस; Update करा माबाईल नंबर अन् ईमेल

25 August 2020 08:09 PM By: भरत भास्कर जाधव

आधार कार्ड हे सर्व भारतीयांसाठी एक महत्त्वाचे ओळख पत्र आहे. शासकीय कामासाठी आधार कार्ड आवश्यक आहे.  दरम्यान केवायसीशी संबंधित सत्यापनासाठी मोबाईल नंबरच्या आधार कार्ड लिंक केल्याने शासकीय कामे खूप सोपे होतात.बऱ्याचवेळेच असे होते की, आधार कार्डधारक आपला मोबाईल नंबर बदलत असतात. अशावेळी आधार कार्डवर आपला नवा मोबाईल नंबर अपडेट करणे खूप क्लेशदायक होत असते.

यासह ईमेल बदलण्याचे कामही त्रासदाय असते. दरम्यान आधार कार्ड अपडेट करण्याविषयी भारतीय विशिष्ट पहचान प्राधिकरण (UIDAI) ने ट्विट करुन याविषयीची माहिती दिली आहे.  आधारमध्ये अपडेट करायचा असेल तर फोटो, बायोमॅक्ट्रिस, लिंग, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी बदलण्यासाठी कोणत्याच कागदपत्रांची गरड नसते.  आपल्याल काही अपडेट करायचा असेल तर, आपल्या जवळील  आधार केंद्रला भेट द्या. दरम्यान आपण ऑनलाईनने आधार केंद्राच्या भेटीची वेळ निश्चित करु शकतात. 

 

https://appointments.uidai.gov.in/bookappointment.aspx'' संकेतस्थळावर लॉगिन  करा.

https://appointments.uidai.gov.in/bookappointment.aspx  यावर लॉगिन करा.  

  • आता शहर, लोकेशन म्हणजेच स्थळ, त्यात आपल्या जवळील आधार केंद्राची निवड करा. 
  • यानंतर 'Proceed to Book Appointment' वर क्लिक करा.
  • आता 'New Aadhaar', 'Aadhaar Update' आणि 'Manage Appointments' मधून आपल्याला हवा असलेला पर्याय निवडा. 
  • यानंतर मोबाईल नंबर, कॅप्चा कोड टाकल्यानंतर 'Generate OTP' वर क्लिक करा.
  • यानंतर UIDAI कडून मागण्यात आलेली सर्व माहिती त्यात भरा, त्यानंतर आपण आपण आपली भेटीची वेळ ठरु शकतात.
  • यासह आधारमध्ये नोंदणी झालेला व्यक्ती आधार रीप्रिंटचे स्टेटस ऑनलाईन तपासू शकतो.

आधार नोंदणी झालेला व्यक्ती ही सुविधा UIDAI वेबसाइट uidai.gov.in, किंवा मोबाईल एप mAadhaar च्या माध्यमातून ऑनलाईन एक्सेस करु शकते. युझर आपला आधार क्रमांक २८ अंक टाकून आपण आपल्या आधारची स्थिती तपासू शकतो. प्रत्येक आधार रीप्रिंटसाठी ५० रुपये इतके शुल्क लागते.

आधार रीप्रिंटचे स्टेटस कसे तपासावे -

  • UIDAI पोर्टेल वर जाऊन "My Aadhaar"  या पर्यायात जाऊन "Check Aadhaar reprint status" हा पर्याय निवडा.
  • त्यानंतर युझर्सची सर्व माहिती नोंदवल्यानंतर १२ अंकाचा आपला आधार क्रमांक आणि २८ अंक सेवा अनुरोध विनंती संख्याही तेथे नोंदवा.
  • आवश्यक माहिती व्यवस्थित भरल्यानंतर "check status" बटनवर क्लिक करा.  त्यानंतर पुढील पेजवर जा. तेथे आधार रीप्रिंट स्टेटस पाहू शकतात.

 

Aadhaar Reprint Status Aadhaar Reprint Reprint Status mobile number Email Update Aadhaar card आधार रीप्रिंट आधार रीप्रिंटचे स्टेटस
English Summary: Check Aadhaar Reprint Status, Mobile Number, Email Update

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.