भाजीपाला आणि फळांची शेती करणाऱ्या छोट्या शेतकऱ्यांना त्यांनी उत्पादित केलेला माल ठेवणे आणि साठवण करण्यासाठी भरपूर प्रमाणात समस्या येतात. परंतु शेतकर्यांच्या या प्रश्नाचे उत्तर इंजिनीरिंग चे विद्यार्थी यांनी शोधून काढले आहे. या विद्यार्थ्यांनी अतिशय स्वस्त आणि नाविन्यपूर्ण असे कुलर तयार केले आहे.
या विशेष कुलर मध्ये चार ते सहा दिवसांपर्यंत भाजीपाला ताजातवाना ठेवता येतो. त्यामुळे शेतकऱ्यांना होणारे नुकसान ही वाचते. या लेखात आपण या कुलर बद्दल माहिती घेऊ.
आय आय टी विद्यार्थ्यांनी बनवले कुलर
शेतकऱ्यांच्या उत्पादनाला अधिक दिवसांपर्यंत सुरक्षित रित्या साठवून ठेवण्यासाठी आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी विशेष असे भाजीपाला कुलर बनवले आहे. या कुलर ची विशेषता म्हणजे त्याला ऑपरेट साठी विज लागत नाही. हे कुलर कमीत कमी एक आठवड्यापर्यंत भाजीपाल्याला ताजातवाना ठेवू शकते. या कुलर ला इंजिनियर्स सरयू कुलकर्णी, विकास जा आणि गुणवंत नेहटे यांनी विकसित केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा भाजीपाला जास्त दिवसांपर्यंत खराब न होता साठवून ठेवता येईल आणि मार्केट पर्यंत सहजतेने पोचता येईल. या कुलर ची डिझाईन ही ठाणे येथील रुकार्ट टेक्नोलॉजी यांनी केली आहे.
स्वस्त आणि टिकाऊ
एग्रीटेक स्टार्ट चे गुणवंत नेहते यांचे म्हणणे आहे की, या कुलर ची निर्मिती ही शेतीमध्ये असलेली जोखीम तसेच शेतकऱ्यांना आर्थिक बाबीत मजबूत करण्यासाठी केली गेली आहे. हे कुलर खूपच स्वस्त, टिकाऊ आणि पर्यावरण साठी अनुकूल आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, शिक्षण घेत असताना त्यांनी त्यांच्या गावांमध्ये का पाहिले की शेतकऱ्यांच्या उत्पादनाला व्यवस्थित भाव मिळत नाही. आणि त्याचे सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे शेतकऱ्यांनी पिकविलेला भाजीपाला लवकर खराब होत असल्यामुळे त्याला योग्य भाव मिळत नाही. तसेचछोट्या शेतकऱ्यांना महागडे तसेच मोठे कोल्डस्टोरेज स्थापने शक्य नाही. म्हणून त्यांनी रु कार्ड चे सहसंस्थापक विकास झा यांच्यासोबत भाजीपाला कुलरच्या कॉन्सेप्ट वर काम केले.
कसे काम करते हे कुलर?
रुक आर्ट चे विकास झा यांनी सांगितले की, हे कुलर बाष्पीकरण शितलन या सिद्धांतावर आधारित आहे. या कुलर ला विजेची आवश्यकता नसते. परंतु दिवसात एक वेळ पाणी द्यावे लागते. शेतकरी आपल्या सोयीनुसार एक कूलर निर्मिती करू शकतात. विकास यांचे म्हणणे आहे की, ज्या शेतकऱ्यांनी या कुलर ची निर्मिती केली अशा शेतकरीइतर शेतकऱ्यांच्या तुलनेत 30 टक्के अधिक भावात आपला भाजीपाला विकतात. रूकार्ट ने ओडिसा मधील सुंदर गड येथे 50 पेक्षा जास्त भाजीपाला कुलर लावले आहेत. जे छोटे शेतकरी भाजीपाल्याला कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवू शकत नाही अशा शेतकऱ्यांसाठी हे कुलर भरपूर प्रमाणात फायदेशीर सिद्ध होईल.
Published on: 05 March 2021, 08:46 IST