News

राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. मात्र ढगाळ वातावरणासह ऊन सावल्यांचा खेळ राज्यात सुरु आहे. तर अधूनमधून हलका पाऊस हजेरी देखील लावत आहे. आज कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार सरींची शक्यता आहे.

Updated on 01 September, 2023 2:32 PM IST

पुणे 

राज्यात पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने पावसाने उघडीप दिली आहे. मात्र (ता. ५) कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार सरींची शक्यता आहे.

राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. मात्र ढगाळ वातावरणासह ऊन सावल्यांचा खेळ राज्यात सुरु आहे. तर अधूनमधून हलका पाऊस हजेरी देखील लावत आहे. आज कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार सरींची शक्यता आहे. 

मराठवाड्याच्या सर्वच भागात पावसाने विश्रांती दिली आहे. यामुळे खुरपणी किटकनाशकांच्या फवारणीच्या कामांना वेग आला आहे. तसंच काही भागात पिकांची वाढ झाली आहे तर काही ठिकाणी वाढ खुंटली आहे.  

दरम्यान,  कोल्हापुरातील साळवण मंडळात ६८.३ मिलिमीटर, पुणे जिल्ह्यातील वेल्हा येथे ५६.५ मिलिमीटर पाऊस पडला. नगर, सोलापूर, सातारा व पुणे, सांगलीच्या पूर्व भागात पावसाअभावी पिके सुकत आहेत.

English Summary: Changes in weather breaks in rain Chance of heavy rain in Konkan
Published on: 05 August 2023, 11:21 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)