News

पर्यावरणामध्ये होत असलेल्या बदलामुळे मान्सूनचा प्रभाव हा दिवसेंदिवस तीव्र होत आहे. बिकट परिस्थिती निर्माण करणारा होत असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. या मान्सूनमध्ये झालेल्या बदलामुळे अन्नसाखळी. कृषी आणि अन्य अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होण्याचा दाट संभव आहे.

Updated on 22 April, 2021 8:05 PM IST

पर्यावरणामध्ये (Environment) होत असलेल्या बदलामुळे मान्सून(Monsoon)चा प्रभाव हा दिवसेंदिवस तीव्र होत आहे. बिकट परिस्थिती निर्माण करणारा होत असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. या मान्सूनमध्ये झालेल्या बदलामुळे अन्नसाखळी. कृषी (Agriculture) आणि अन्य अर्थव्यवस्थे(Economy)वर विपरीत परिणाम होण्याचा दाट संभव आहे.

याबाबतचे सविस्तर विश्लेषण हे अर्थ सिस्टीम डायनॅमिक्स (Earth System Dynamics) या नियतकालिकात देण्यात आले आहे. या विश्लेषणात मध्ये जवळ जवळ 30 हून अधिक पर्यावरण प्रारूपाची तुलना करण्यात आली आहे. या प्रारूपांचा तुलनात्मक अभ्यास करून आगामी काळात जास्तीत जास्त तेवढा त्याचा पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  भारतासारख्या शेती आणि शेतीपूरक व्यवसायावर अवलंबून असलेल्या देशांसाठी अधिक तीव्रतेचा पाऊस ही चांगली गोष्ट नाही असे संशोधकांनी नमूद केले आहे.

 

1950 च्या दशकापासून पर्यावरणामध्ये होणाऱ्या मानवी हस्तक्षेपाने पर्यावरणातील होणार या बदलांनी हजार वर्षांमध्ये नैसर्गिक बदलांचा वेगाला मागे टाकण्यास सुरुवात केली आहे. मान्सून मध्ये असलेली अधिकची अस्थिरता आणि अनियमितता ही शेती आणि अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक असतो. हवामानातील टोकाचे बदल आणि त्यांच्या गंभीर परिणामांचा अंदाज न करता येणारे आहेत. असे मत अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातील लेखक अँडर्स लेवरर्मेन यांनी मांडले आहेयांनी मांडले आहे.

हेही वाचा : जागतिक पृथ्वी दिवस आज: पण फक्त एक दिवसच का?

 तापमान वाढ करणार्‍या प्रत्येक अंश सेल्सिअसमुळे मान्सूनचा पाऊस पडण्याचे प्रमाण पाच टक्क्यांनी वाढत आहे. जागतिक तापमान वाढीमुळे भारतात मान्सूनचा पाऊस पूर्वीपेक्षा अधिक जोरदारपणे कोसळत आहे आणि हे प्रमाण आधी केलेल्या अंदाजापेक्षा कितीतरी अधिक आहे.  - ऐन्जा कॅटझेंबेरगर, संशोधक

English Summary: Changed Monsoon will destroy to Agriculture and Economy 22
Published on: 22 April 2021, 08:01 IST